(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
2026 मध्ये भरपूर मनोरंजन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अल्ट्रा झकास ओटीटी या वर्षात प्रेक्षकांसाठी या वर्षात प्रेक्षकांसाठी अधिक मजेदार, धमाकेदार आणि झकास कंटेंट घेऊन येत आहे. अल्ट्रा झकास ओटीटीवर सुपरहिट मराठी चित्रपट आणि वेब सिरीजचा नवा खजिना तुमच्या भेटीला येणार आहे.
धमाल कॉमेडी-फॅमिली ड्रामा ‘कोंबडा पळाला लंडनला’
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना हसवून लोटपोट करायला येत आहे. धमाल कॉमेडी-फॅमिली ड्रामा ‘कोंबडा पळाला लंडनला’. हा चित्रपट कोंबडा आणि फुल्ल ऑन राडा यांच्यासोबतच्या मजेशीर कहाण्या सादर करतो.या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ०२ जानेवारीपासून अल्ट्रा झकास ओटीटीवर होणार आहे, आणि मराठी प्रेक्षकांसाठी हा अनुभव थेट आपल्या घरपोच उपलब्ध होईल.
‘कैरी’ कथा एका जिद्दीची आणि शोधाची…
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर एका आंबट-गोड प्रवासाची कहाणी उलगडणार आहे. अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि शंतनू रोडे दिग्दर्शित ‘कैरी’ हा चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटी वर १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.गावाकडचं साधेपण जपलेली कावेरी तिच्या नवऱ्यासोबत बाहेरगावी जाते, पण तिच्यासोबत नियती एक वेगळीच खेळी खेळते. तिचा नवरा अचानक बेपत्ता होतो आणि एका रात्रीत तिचं विश्व बदलून जातं. अनोळखी शहर, कठीण वास्तव आणि रोजचा संघर्ष सोबतीला असताना, ती एकटीच आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी कंबर कसते. हा शोध तिला स्वतःची एक नवी ओळख मिळवून देतो. या चित्रपटात सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव आणि शशांक केतकर हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
खोताची वाडी’ कथा एका शापित वाड्याची
‘IPC’ या सुपरहिट वेब सिरीजच्या यशानंतर,नवीन वर्षाच्या नव्या सुरुवातीला दिग्दर्शक राजेश चव्हाण घेऊन येत आहेत काळजाचा ठोका चुकवणारी एक नवी ओरिजिनल हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी’ अल्ट्रा झकास ओटीटी वर लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.एका जुन्या वाड्याच्या बंद दारांमागे दडलंय अनेक वर्षांचं गूढ आणि एक भयानक शाप. अदृश्य शक्तींचा असा खेळ, जो विज्ञानाच्याही पलीकडचा आहे.
OMG 3 मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? आता ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री साकारणार देवीची भूमिका
साउथचा तडका आता मराठीत लागणार…
नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार होण्यासाठी मराठी प्रेक्षकांसाठी खास साऊथचे दोन सुपरहिट चित्रपट मराठीत प्रदर्शित करण्यात येणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच ०९ जानेवारी २०२६ ला पहायला विसरू नका ‘Chathuram (तिचं आयुष्य)’, जो एका स्त्रीच्या अस्तित्वाचा लढा आणि सन्मानाची थरारक गाथा मांडतो. सिद्धार्थ भारथन दिग्दर्शित हा ड्रामा-थ्रिलर चित्रपट गूढता आणि सामाजिक वास्तवाचा एक अनोखा संगम आहे. महिन्याच्या शेवटी ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होत आहे






