दाक्षिणात्य सिने सृष्टीतून फिल्म इंडस्ट्रीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आर सुब्बलक्ष्मी यांचे निधन (R Subbalakshmi Death) झाले आहे. 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासून केरळच्या कोची येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आजीची भूमिका साकारून आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. त्यांनी सुशांतसिंह राजपूतसोबत दिल बेचारा सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्यांनी सुशांतच्या आजीची भूमिका साकारली होती.
[read_also content=”जाणून घ्या लाल फित कसं बनलं एड्सचं प्रतीक; काय आहे महत्त्व! https://www.navarashtra.com/india/what-is-importance-of-red-ribboon-logo-of-world-aids-day-nrps-485201.html”]
आर सुब्बलक्ष्मी या अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्कृष्ट संगीतकार आणि चित्रकार देखील होत्या. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी आर सुब्बलक्ष्मी यांनी जवाहर बालभवनमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षिका म्हणून काम केले आणि 1951 मध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये पद भूषवले. विशेषत: ऑल इंडिया रेडिओवर दक्षिण भारतातील पहिली महिला संगीतकार होण्याचा मान तिला मिळाला आहे. आपल्या भूमिकांसोबतच त्यांनी विविध संगीत कार्यक्रमांतूनही आपली संगीत प्रतिभा दाखवली. सुब्बलक्ष्मी डबिंगच्या कामातही निष्णात होत्या. त्यांनी टेलिफिल्म्सना आवाज दिला आणि अल्बम्सही बनवले. नंदनम या मल्याळम चित्रपटातून त्याने पदार्पण केले. सुब्बलक्ष्मीने वेशामणी अम्मलच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. तिला आवडणारे आणखी एक पात्र म्हणजे कल्याण रमणमधील कार्तयानी अम्मा यांची भूमिका.
आर. सुब्बालक्ष्मी यांनी मल्ल्याळम शिवाय, तमिळ, तेलुगू, कन्नड,हिंदी, संस्कृतमध्येही काम केल आहे. यासोबतच त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं.
आर सुब्बलक्ष्मी यांनी सीता कल्याणम, ओरु पेनिंटे कथा यासह इतर भाषांमधील ६५ हून अधिक मालिकांमध्येही काम केले. त्याचवेळी त्यांची मुलगी थारा कल्याण हिनेही सिनेविश्वातील प्रवास सुरू ठेवला आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत करिअर केले.