सध्या चित्रपटसृष्टीत लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. नुकतंच रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचं लग्न झाले. यानंतर टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनानेही तिच्या प्रियकराशी लग्न केलं. सध्या अभिनेत्री तापसी पन्नूनही तिच्या बॅायफ्रेंडसोबत लग्न उरकल्याच्या बातम्या येत आहेत. आता पुन्हा एका सेलेब्रिटी जोडप्यानं लग्नगाठ बांधल्याच वृत्त समोर येत आहे. रिपोर्टनुसार अभिनेता सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनीही लग्नगाठ (Aditi Rao Hydari Sidhhart Wedding) बांधली आहे. तेलंगणातील एका मंदिरात दोघांनी गुपचूप लग्न केले. दोघेही लवकरच त्यांच्या लग्नाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
[read_also content=”अखेर ‘तारक मेहता का..’ ची अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीला मिळाला न्याय, लैंगिक छळ प्रकरणी निर्माते असित कुमार मोदींना ठोठावला दंड! https://www.navarashtra.com/movies/jennifer-mistry-bansiwal-wins-sexual-harassment-case-against-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-producer-asit-modi-nrps-518235.html”]
सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत नात्यात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबाबत अफवा पसरल्या होत्या, मात्र दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतकेच नाही तर दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही पुष्टी केली नव्हती. पण ताज्या रिपोर्टनुसार, दोघांनी तेलंगणातील एका मंदिरात गुपचूप लग्न केले.
त्यांच्या नात्याला पुढे नेत, सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. तेलंगणातील वानपर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात दोघांचे लग्न झाले. दोघांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. या दोघांनी 2021 मध्ये अजय भूपती दिग्दर्शित तेलुगू चित्रपट महासमुद्रममध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये नातं निर्माण झालं. सिद्धार्थने आपल्या करिअरमध्ये तेलुगू, तमिळ, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर आदिती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.