Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथा- हँडलूम साड्यांचा नवा अध्याय, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत उत्साहात उद्घाटन

'Pratha' popular handloom saree brand.पुण्यात लोकप्रियता मिळवल्यानंतर आता 'प्रथा' हा लोकप्रिय हँडलूम साडी ब्रँडचे ठाण्यात भव्य शोरूम.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2025 | 07:43 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर, सुप्रसिद्ध ब्रायडल हेअर अँड मेकअप एक्स्पर्ट कविता कोपरकर यांचा ‘प्रथा’ हा लोकप्रिय हँडलूम साडी ब्रँड आता ठाण्यातील राम मारुती रोडवरील आपलं नवं आणि भव्य शोरूम घेऊन सज्ज झाला आहे. नुकतेच या भव्य शोरुमचे उदघाटन झाले. भारतीय हातमाग साड्यांच्या सौंदर्याला आधुनिकतेची झळाळी देणाऱ्या या ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते.

अनेक नामवंत कलाकारांची हजेरी

या विशेष कार्यक्रमाला श्रेया बुगडे, सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, चैत्राली गुप्ते, सावनी रविंद्र, राधा सागर, राधिका विद्यासागर, सुखदा खांडकेकर, मेघना एरंडे, शिवानी रांगोळे, गिरिजा ओक, क्षिती जोग, धनश्री काडगावकर, अमृता देशमुख, प्राजक्ता हनमघर, स्पृहा जोशी, तसेच लोकप्रिय अभिनेते शशांक केतकर, अभिजित खांडकेकर आणि मंजिरी ओक हे सेलिब्रिटी उपस्थित होते.

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ वादावर आर्यनने मौन सोडलं, म्हणाला,”कोणाचाही अपमान..”

२०१६ साली केवळ ३२ सिल्क साड्यांपासून सुरूवात

२०१६ साली केवळ ३२ सिल्क साड्यांपासून सुरू झालेली ‘प्रथा’ची ही सफर आज हजारो साड्या विकणाऱ्या लोकप्रिय ब्रँडमध्ये रूपांतरित झाली आहे. ब्रायडल इंडस्ट्रीमध्ये ४५०० हून अधिक वधूंना सजवण्याचा अनुभव असलेल्या कविताने साडीप्रेम, रंगसंगतीची जाण आणि पारंपरिक कलाप्रेम यांचा संगम साधून ‘प्रथा’ची स्थापना केली.

पुण्यातील भांडारकर रोडवरील २५०० चौ.फुटांचे आकर्षक स्टोअरनंतर आता ‘प्रथा’चे आता ठाण्यात दोन मजली आणि सुमारे ३००० चौ.फुटांचे भव्य शोरूम आहे. या ठाणे स्टोअरमध्ये भारतातील ४० पेक्षा अधिक विविध वीण व पारंपरिक शैलीतील साड्या पाहायला मिळतील. प्रत्येक साडी स्वतः कविता कोपरकर वैयक्तिकरित्या देशभरातील वीणकरांकडून निवडतात. आजवर रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, अनुराधा पौडवाल, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, पर्ण पेठे, शिवानी सोनार, शिवानी रांगोळे स्वानंदी टिकेकर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी या साड्या परिधान केल्या आहेत.

बिग बींच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शिरोडकरची खास पोस्ट; म्हणाली, “लहानपणी त्यांच्याशी लग्न…”

या प्रवासाबद्दल कविता कोपरकर म्हणतात, ‘ ‘प्रथा’ साडीच्या ब्रँडबरोबरच भारतीय परंपरेचं आणि स्त्रीच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. ठाण्यातील या नव्या प्रवासातून आमचं उद्दिष्ट आणखी मोठं आहे. महाराष्ट्रातील पहिला असा साडी ब्रँड बनवण्याचं, जो देशभर आणि जगभर भारतीय हातमाग साड्यांचं वैभव पोहोचवेल.”

या ब्रँडमध्ये ५० हून अधिक महिला कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. प्रथाची दोन्ही स्टोअर्स शांत, आल्हाददायक आणि लक्झरियस इंटीरियरसाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील स्टोअरमध्ये एक वेगळा रिसेप्शन एरिया तयार करण्यात आला आहे, जो साडी स्टोअरसाठी अत्यंत अनोखा आणि आकर्षक आहे. प्रत्येक साडीप्रेमी स्त्रीला आपल्या बजेटनुसार परिपूर्ण साड्या इथे मिळणार आहेत.

Web Title: After gaining popularity in pune now a grand showroom in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Celebrity
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ?  काय आहे यामागची आख्य़ायिका ?
1

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ? काय आहे यामागची आख्य़ायिका ?

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
2

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

Mumbai News : भारत जगातील सर्वाधिकमोठी अर्थव्यवस्था होईल;  प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
3

Mumbai News : भारत जगातील सर्वाधिकमोठी अर्थव्यवस्था होईल; प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

ती परत आलीये! ३० वर्षांनंतर ‘दामिनी 2.0’ पुन्हा सह्याद्रीवर झळकणार
4

ती परत आलीये! ३० वर्षांनंतर ‘दामिनी 2.0’ पुन्हा सह्याद्रीवर झळकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.