(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, ज्यांनी काही काळी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली होती.अलीकडे बिग बॉस 18 मध्ये तिची झलक पाहायला मिळाली, जिथे करणवीर मेहरा आणि विवियन डीसेना यांच्याशी तिची मैत्री चर्चेचा भाग ठरली. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने त्यांच्या सोबतचा ‘खुदा गवाह’ चित्रपटातील एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
शिल्पाने शेअर केलेल्या पोस्टमधून तिने तिची एक जुनी इच्छादेखील सांगितली आहे. शिल्पाने ‘खुदा गवाह’ चित्रपटातील अमिताभ यांच्याबरोबरचे दोन फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिली आहे. तिने दिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. यामधून तिने “मला लहानपणी ज्यांच्याबरोबर लग्न करायचं होतं आणि ज्यांनी मला सहकलाकार म्हणून खूप काही शिवकलं, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं म्हटलं आहे
मशिदीत बूट घालून गेल्याने Sonakshi Sinha भयंकर ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अभिनंदन! ही कन्व्हर्ट…’
शिल्पा शिरोडकरने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम’ या चित्रपटातही बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. मुकुल एस. आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, दीपा साही, शिल्पा शिरोडकर, डैनी डेन्जोंगपा, अनुपम खैर आणि कादर खान हे अनेक लोकप्रिय कलाकार झळकले होते. हा चित्रपट 1995 मध्ये आलेल्या सुपरहिट तमिळ चित्रपट ‘बाशा’वर आधारित असल्याचं मानलं जातं.
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ वादावर आर्यनने मौन सोडलं, म्हणाला,”कोणाचाही अपमान..”
शिल्पा शिरोडकर लवकरच ‘जटाधारा’ या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती शोभा ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. शिल्पा शिरोडकरचा हा चित्रपटातून पुनरागमन असणार आहे आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.