(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शित वेबसीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असली, तरी या सीरिजमुळे निर्माण झालेला वाद अद्याप संपलेला नाही. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी या सीरिजविरोधात मानहानीचा दावा दाखल केला असून, यामुळे हा वाद चांगलाच गाजत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या आर्यन खानने अखेर प्रतिक्रिया दिली आहे. व्हरायटी या आंतरराष्ट्रीय माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत आर्यन म्हणतो,“बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील काही प्रसंग हे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित असले तरी, कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू आम्ही कधीही ठेवलेला नाही.”आर्यनचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे, जेव्हा समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट या दोन प्रोडक्शन हाऊसेसविरोधात कोर्टात दावा दाखल केला आहे.
वानखेडे यांचा दावा आहे की, या सीरिजमधील एक पात्र त्यांची बदनामी करत आहे, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा खराब होत आहे आणि कायदा लागू करणाऱ्या यंत्रणांवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे.
Bobby Deol: बॉबी देओलचे ‘ते’ विधान चर्चेत; म्हणाला, “धर्मेंद्र सध्या आई….”
या प्रकरणाबद्दल बोलताना आर्यन खान म्हणाला की, “माझ्या टीमला बॉलिवूडची ‘डार्क साईड’ प्रेक्षकांसमोर मांडायची होती. ग्लॅमरच्या पडद्यामागे जे चालतं, ती न पाहिलेली बाजू आम्हाला डार्क ह्युमरच्या माध्यमातून दाखवायची होती.” तो पुढे स्पष्ट करतो की,“माझा उद्देश इंडस्ट्रीतील काही ‘इनसायडर्स’वर उपरोध करणे हा होता. मात्र कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणालाही लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता.” आर्यन खानच्या म्हणण्यानुसार, त्याला आपल्या बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमधून कोणाचाही अपमान करायचा नव्हता.
मशिदीत बूट घालून गेल्याने Sonakshi Sinha भयंकर ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अभिनंदन! ही कन्व्हर्ट…’
आर्यन खान पुढे म्हणाला की, “या इंडस्ट्रीत असण्याची खास गोष्ट ही आहे की, तुम्हाला स्वतःचीच थट्टा करायला जमली पाहिजे. जर तुम्ही स्वतःची थट्टा करू शकत असाल, तरच इतरांना तुमच्या विनोदी शैलीने हसवू शकता.” तो पुढे म्हणतो,“आम्हाला काही सीन्सवर प्रतिक्रिया मिळाल्या, जिथे लोक म्हणाले की हे खूप जास्त आहे किंवा काही गोष्टी अतीप्रदर्शित वाटल्या. पण मी एक भूमिका घेतली, जर हे तुम्हाला पटत नसेल, तर हा शो तुमच्यासाठी नाही. मात्र, तुमचं १८ वर्षांचं मूल किंवा विनोदी शैली समजणारे तुमचे काका हा शो नक्कीच एन्जॉय करू शकतात.”