मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा ‘रेड’ हा सिनेमा (Raid Movie) बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. श्वास रोखण्यास भाग पडणारी कथा आणि त्याचे चित्रीकरण यामुळे ‘रेड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल (Raid 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता देखील झळकणार आहे. मराठी अभिनेता महत्त्वाचे खलनायकाचे पात्र साकारताना दिसणार आहे.
‘रेड 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. यामध्ये मराठी अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) प्रमुख खलनायकाची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी देखील अभिनेता रितेश देशमुख याने एक व्हिलन चित्रपटामध्ये व्हिलनची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते. यानंतर पुन्हा एकदा रितेशला निगेटीव्ह पात्र साकारताना प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
मागील आठवड्यामध्ये ‘रेड 2’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सध्या मुंबईमध्ये चित्रपटाची शुटिंग सुरु करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ‘रेड 2’ चित्रपटाचे शुटिंग होणार आहे.
2018 साली आलेल्या रेड या चित्रपटामध्ये अजय देवगण याने IRS अमय पटनायक हे पात्र साकारले होते. आता ‘रेड 2’ मध्ये देखील पटनायक यांना नवीन टीप लागली असून त्याचा शोध चित्रपटामध्ये करण्यात येणार आहे. ‘रेड 2’ चित्रपटामध्ये इन्कम टॅक्स विभागातील अनसन्ग हिरोंचा गौरव होणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा अभिनेता अजय देवगण दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि निर्माते भूषण कुमार, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार पुन्हा एकत्र आले आहेत. यामध्ये आता रितेश देशमुख खलनायकाचे पात्र साकारणार आहे.