71.33 KM मायलेज देणाऱ्या 'या' Hybrid Scooter वर ग्राहक तुटून पडलेत, किंमत फक्त...
जेव्हापासून GST चे नवीन दर लागू झाले आहेत. तेव्हापासून भारतात दुचाकी सेगमेंटमध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली आहे. देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Yamaha Motors. यामाहा भारतीय ऑटो बाजारात आपल्या अनेक दुचाक्या विकते. याशिवाय, कंपनी येथे उत्पादित केलेले मॉडेल परदेशात देखील निर्यात करत असते. अलीकडेच लागू झालेल्या GST 2.0 नंतर, गेल्या महिन्यात कंपनीच्या विक्रीत किंचित वाढ झाली आहे. एकीकडे, यामाहा Yamaha RayZR कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी राहिली. तर त्याच वेळी, यामाहा Yamaha FZ आणि Aerox ची विक्री देखील वाढली आहे.
यामाहाच्या स्कूटर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर Yamaha RayZR आहे. गेल्या महिन्यात या स्कूटरला 27,280 नव्या ग्राहकांची पसंती मिळाली. हे आकडे सप्टेंबर 2024 मधील 16,542 युनिट्सच्या तुलनेत वार्षिक पातळीवर 64.91% वाढ दर्शवतात.
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 80,875 रुपयांपासून सुरू होते. RayZR ला ARAI कडून प्रमाणित 71.33 km/l इतके मायलेज मिळाले आहे. यात 125cc एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले असून ते 8.2 PS पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क निर्माण करते.
विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर Yamaha FZ आहे. गेल्या महिन्यात या बाईकला 16,137 नव्या ग्राहकांनी पसंती दिली. हे आकडे सप्टेंबर 2024 मधील 13,617 युनिट्सच्या तुलनेत 18.51% वाढ दर्शवतात.
तिसऱ्या क्रमांकावर Yamaha MT15 आहे. सप्टेंबर 2025 मध्ये या बाईकच्या 11,695 युनिट्स विकल्या गेल्या. तर सप्टेंबर 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 12,286 युनिट्सच्या तुलनेत यामध्ये 4% घट झाली आहे.
विक्रीत चौथ्या क्रमांकावर Yamaha R15 आहे. मागील महिन्यात या बाईकच्या 9,329 युनिट्स विकल्या गेल्या, जे सप्टेंबर 2024 मधील 10,614 युनिट्सच्या तुलनेत 12% घसरण दर्शवतात.
New Hyundai Venue मध्ये मिळणार ‘हे’ अफलातून फीचर्स, सध्याच्या मॉडेलपेक्षा किती वेगळी असेल कार?
पाचव्या क्रमांकावर लोकप्रिय स्कूटर Yamaha Fascino आहे. गेल्या महिन्यात 5,955 लोकांनी ही स्कूटर खरेदी केली. सप्टेंबर 2024 मधील 11,491 युनिट्सच्या तुलनेत विक्रीत 48% घट झाली आहे.
देशातील सर्वाधिक पॉवरफुल स्कूटरपैकी एक असलेल्या Yamaha Aerox ला मागील महिन्यात 2,901 नव्या ग्राहकांची पसंती मिळाली. सप्टेंबर 2024 मधील 2,142 युनिट्सच्या तुलनेत याच्या विक्रीत 35.43% वाढ झाली आहे.






