अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हे बॉलीवूडमधील एक क्यूट कपल आहे. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी असलेली ट्विंकल खन्ना उर्फ टीनाला एक वर्ष डेट केल्यानंतर अक्षय कुमारने तिच्यासोबत लग्न केलं. ट्विंकलच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त (Twinkle Khanna Birthday) अक्षयने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ (Funny Video) शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने ट्विंकलसाठी खास मेसेज लिहिला आहे.
अक्षय कुमारने व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, “तु भलेही माझा परफॉर्मन्स मिस करुन खुश होत असशील, पण मला आनंद आहे की मी दररोज तुला आणि तुझ्या वेडेपणाला बघत असतो. मी तुझ्यावर प्रेम करत असलो तरी मला असं वाटतं की तु गाणं गायला नको. हॅपी बर्थ डे टिना.”
ट्विंकल खन्नाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. त्यानंतर ट्विंकल एक गृहिणी, लेखिका आणि इंटिरियर डिझायनर म्हणून समोर आली. ट्विंकल खन्ना आणि तिचे वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी २९ डिसेंबरला असतो. वाढदिवसाला ट्विंकल तिच्या बाबांना दरवर्षी खूप मिस करते.