अयान मुखर्जी (Ayan Mukherji), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यातली मैत्री ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटामुळे आणखीन घट्ट झाली. ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने या तिघांनी एकमेकांबरोबर खूप वेळ घालवला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही हे तिघे अनेक ठिकाणी फिरले. अशातच आलियाने इन्स्टाग्रामवर रणबीरचा एक व्हिडिओ(Ranbir Kapoor Video) शेअर केला आहे. ज्यात रणबीर अयानवर वैतागलेला दिसत आहे.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पुढील आठवड्यात ४ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या ओटीटीवरील आगमनाबाबतची घोषणा आणि प्रमोशन करणारा गमतीशीर व्हिडिओ आलियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत रणबीर कपूर एका व्यक्तीशी फोनवर बोलतो की, “मी आता अयानबरोबर ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन करून थकलो आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हीट झाला आहे. त्यामुळे आता मला पुन्हा त्याच्या ओटीटी रिलीजचे प्रमोशन करायचं नाही. मी आता बाबा होणार असल्याने मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे.” त्यानंतर रणबीरला अयानचा फोन येतो आणि रणबीरचा सूर अचानक बदलतो. तो अयानला म्हणतो, “आपण ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन करायलाच पाहिजे. मी पुन्हा एकदा प्रमोशन करायला तयार आहे.”
हा व्हिडिओ शेअर करत आलियाने लिहिलं आहे की, ‘कटू सत्य’. रणबीरचा हा मजेदार व्हिडिओ सगळ्यांना आवडला आहे.