आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या गरोदरपणामुळे बरीच चर्चेत आहे. आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार असून ती आयुष्यतील हे क्षण फार एन्जॉय करताना दिसत आहे. अशातच आता बाळ होण्यापूर्वी आलिया भट्टने आपल्या आयुष्यात एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट आपले नाव बदलण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहे. मात्र आलिया भट्टच आलिया कपूर हे नाव तिचे चाहते कसे स्वीकारतील हा प्रश्न असल्यामुळे आलियाने आपल्या नावात थोड्या वेगळ्या पद्धतीने बदल करण्याचे ठरवले आहे. आलियाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आता कपूर कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे लवकरच मी आता अधिकृत रित्या कपूर होईन. मी माझ्या नावासोबत आता कपूर नाव जोडेन, आणि मला हे करताना खूप आनंद होत आहे.
रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर आपल्या पासपोर्टवर मॅरिटल स्टेटस बदलले होते. याविषयी बोलताना आलिया म्हणाली, ”आता आमचं बाळ लवकरच येईल. आता मला भट्ट राहायचं नाही. कपूर कुटुंब खूप मोठं आणि एकत्र कुटुंब आहे, तुम्हाला कळालं असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे. मला लेफ्ट आऊट असल्यासारखं त्यांच्यात फील नाही करायचं. आलिया पुढे म्हणाली, मी नेहमीच आलिया भट्ट राहीन, पण आता त्या भट्ट नावापुढे कपूर नाव असेल”. तेव्हाआलिया भट्ट आता तीच नाव बदलून आलिया भट्ट कपूर असं करणार आहे. यापूर्वी आलियाची नणंद म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर हिने देखील लग्नानंतर आपले नाव करीना कपूर खान असे केले होते.