Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ट्विटर अकाऊंटवरून 22 एप्रिल रोजी ब्लू टिक हटवण्यात आली. मात्र, आता पैसे भरल्यानंतर पुन्हा एकदा बिग बींना ब्लू टिक मिळालीय. ब्लू टिकवरून बिग बींचं ट्विट (Big B twit) सध्या खूप चर्चेत आहे.
याआधी ट्विटर अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागत नव्हते. मात्र, एलॉन मस्क सीईओ झाल्यानंतर मस्क यांनी ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शनची घोषणा केली. त्यानुसार सबक्रिप्शन न घेणाऱ्या यूजर्सची ब्लू टिक 22 एप्रिलला हटवण्यात आली. बिग बी अमिताभ बच्चन यांचाही ब्लू टिक गमावणाऱ्यांमध्ये समावेश होता. बिग बी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यामुळे ब्लू टिक गेल्यानंर बिग बींनी केलेलं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं.
T 4623 – ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं – Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा ?जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023
T 4624 –
ए Musk भैया ! बहुत बहुत धन्यवाद देत हैं हम आपका !
उ , नील कमल ✔️ लग गवा हमार नाम के आगे !
अब का बताई भैया ! ?
गाना गये का मन करत है हमार !
सनबो का ?
इ लेओ सुना :
“तू चीज़ बड़ी है musk musk … तू चीज़ बड़ी है, musk ” ?— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “ट्विटर दादा, ऐकताय का, आम्ही आता पैसेसुद्धा भरले आहेत. त्यामुळे आता जी ब्लू टिक लावता ना नावाच्या पुढे ती पुन्हा लावून द्या की, म्हणजे लोकांनाही कळू दे की मीच
अमिताभ बच्चन आहे. हात जोडलेत आता काय पाया पडू का?” असं त्यांनी ट्विट केलं होतं. मस्कवर त्यांनी मिश्कीलपणे दोन वेगवेगळे ट्विट केले होते.
बिग बी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केले आहे. ब्लू टिकचा त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “ट्विटर, मी आता ब्लू टिकसाठी पैसे भरले आहेत, तर आता तुम्ही म्हणतात की ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांना ब्लू टिक फ्रीमध्ये मिळणार आहे. असं असेल तर मग माझे तर 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. मग आता? खेल खतम, पैसा हजम?”, असं बिग बींनी ट्विट केलं आहे.
T 4627 – अरे मारे गये गुलफाम , बिरज में मारे गये गुलफाम ?
ए ! Twitter मौसी, चाची, बहनी, ताई, बुआ .. झौआ भर के त नाम हैं तुम्हार ! पैसे भरवा लियो हमार, नील कमल ख़ातिर ✔️ अब कहत हो जेकर 1 m follower उनकर नील कमल free म
हमार तो 48.4 m हैं , अब ??
खेल खतम, पैसा हजम ?!?— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 23, 2023
ट्विटरने ब्लू टिक हटवल्याचा फटका अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, शाहीद कपूर यांच्यासह अनेकांना फटका बसला होता.