बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये कलर्स मराठीवरील (Colors Marathi) ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी – राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले (Tanvi Mundale) आणि विवेक सांगळे (Vivek Sangale) यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले साप्ताहिक कार्य. साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले आणि त्याची विजेती ठरली टीम ए.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये येणार आहेत समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस. आज घरामध्ये अमृता फडणवीस यांच्या साथीने सदस्य दिवाळीचा सण साजरा करणार आहेत.
[read_also content=”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नोव्हेंबरमध्ये आमदारांसह अयोध्या दौरा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-chief-minister-knath-shinde-ayodhya-visit-with-mlas-nrsr-339316.html”]
बिग बॉस यांनी जाहीर केलं की, आज घरात येणार आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस… त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगलेच पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृताजींना काही प्रश्न देखील विचारले.
यशश्रीने विचारले देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? अमृताजी म्हणाल्या त्यांना पोहेतरी हा पदार्थ खूप आवडतो. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते. किरण माने यांनी विचारले, तुम्हाला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असतं, पण मला तुम्हाला विचारायचं आहे बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे ? अमृताजी म्हणाल्या, मी तुम्हाला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. एकनाथ शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.