file photo
यंदाच्या फेमिना मिस इंडिया सिनी शेट्टीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडिओ हे डान्सचे व्हिडिओ आहेत. सिनी शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सिनीचा हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
सिनी शेट्टीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लेहेंगामध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहता हा व्हिडीओ बराच जुना असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सिनी अतिशय सुंदर डान्स करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी अश्लील कमेंटही करायला सुरुवात केली. एकाने लिहिले की ती सामान्य मुलीसारखी दिसते. तिच्यात आश्चर्यकारक काहीही नाही. त्याचवेळी काही लोकांना सिनीमध्ये दिशा पटनीची झलकही पाहायला मिळाली.