फोटो सौजन्य: सोनी टेलिव्हिजन इन्स्टाग्राम
मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी ब्रेकअप केल्याचे समोर आले. ब्रेकअप झाला असला तरीही ते एकमेकांना कायमच आपल्या कामातून ते पाठिंबा देताना दिसत असतात. मलायकाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अर्जुन कपूरने तिच्या कठीण काळात तिची साथ दिल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन कपूर चर्चेत आले आहेत.
सध्या अर्जुन त्याच्या ‘मेरे हसबंड की बीवी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मलायका अरोराच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’या डान्स रिॲलिटी शोमध्ये प्रमोशन करीता हजेरी लावली होती. यावेळी अर्जुन कपूरसोबत प्रमोशनसाठी चित्रपटातल्या इतर कलाकारांनीही शोमध्ये हजेरी लावली होती. ब्रेकअपनंतर आता पहिल्यांदाच मलायका आणि अर्जुन एकत्र आले आहेत. शोमध्ये मलायकासाठी अर्जुनने केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शोच्या प्रोमोमध्ये मलायकाच्या लोकप्रिय गाण्यांवर तिच्यासोबत रेमो डिसूझा, गीता कपूरसह स्पर्धकांनीही स्टेजवर अफलातून डान्स केला. या डान्सचे फक्त प्रेक्षकांनीच नाही तर, अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरनेही कौतुक केले. त्यानंतर शोच्या सुत्रसंचालकांनी अर्जुन कपूरला त्याला डान्स कसा वाटला, यावर त्याची प्रतिक्रिया विचारली. यावर अर्जुन कपूरने सांगितलं की, “गेल्या अनेक वर्षांपासून माझी बोलती बंद झाली आहे. मी अजूनही शांतच राहणं पसंद करतोय. मुख्य गोष्ट म्हणजे, माझे आवडते गाणे आज मला ऐकायला मिळाले आहेत. या गाण्यांमधून तिच्या करिअर आणि आयुष्याविषयी जाणून घेता येते. अशा प्रकारची गाणी, परफॉर्मन्स आणि आताही ती व्यक्ती ज्या पद्धतीने तिचे काम करीत आहे, त्यासाठी तिचे आपण कौतुक करू शकतो, त्यासाठी मलायका तुझे अभिनंदन. तुला माहितच आहे की मला ही गाणी किती आवडतात. अशा पद्धतीने तू हे सर्व साजरे करत आहेस, हे पाहून आनंद झाला”, अर्जुनच्या या प्रतिक्रियेनंतर मलायकाने त्याला “धन्यवाद” म्हणत प्रतिसाद दिला.
त्यानंतर मलायका म्हणते आता मला किती मार्क्स मिळणार ? असा प्रश्न विचारते. यावर अर्जुन म्हणतो, ट्रॉफी मिळायला हवी हिला तर… हिच्यासोबतच्या स्पर्धेबद्दल मला सर्व काही माहितीये, चांगल्या चांगल्या लोकांची मी बोलती बंद करतो. असं म्हणत मलायकाची त्याने बोलती बंद केली. मलायका आणि अर्जुनमध्ये चांगलीच टोमणेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मलायका आणि अर्जुन कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गेल्या वर्षी (२०२४ मध्ये) हे जोडपे वेगळे झाले. अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात याबद्दल वक्तव्य केले होते. तो सिंगल असल्याचे म्हणाला होता. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते. अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘मेरी हजबंड की बीवी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी शेवटचा अर्जुन ‘सिंघम रिटर्न’मध्ये दिसला होता. त्याच्या विलनच्या भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधले.