मुंबई “आई कुठे काय करते” (Aai kuthe kay karte) या मालिकेत अनेक वळणं येतायत. काही दिवसांपूर्वी अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या कॉलेजच्या काळातील मित्राची म्हणजेच आशुतोष केळकर याची एण्ट्री झाली. आशुतोषचं (Ashutosh)कॉलेजच्या दिवसापासून अरुंधतीवर प्रेम..पण तो कधी व्यक्त करू शकला नाही. कालांतराने त्याची अरुंधतीशी (Arundhati) भेट होते. तिला गाण्याची ऑफर देऊन त्यांच्या भेटीगाठी वाढत जातात. दोघांचं भेटणं अनिरुध्दला काही पसंत पडत नाही. त्यातच अरुंधती रेकॉर्डिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेली होती. तिथे आलेल्या काही अडचणींमुळे तिला आशुतोषसोबत बाहेर एक रात्र काढावी लागली. त्यावरून अनिरुद्ध(Anirudha) आणि त्याची आई थेट तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. हा अपमान सहन न झाल्याने या दोघांना खडे बोल सुनावत स्वाभिमानी अरुंधती देशमुख कुटुंबातून कायमस्वरुपी बाहेर पडते. अरुंधतीने घराबाहेर जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे मालिकेच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केले.
देशमुख कुटुंबाने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय करत घरातून बाहेर काढले त्यांच्यासमोर आशुतोष अरुंधतीवरील आपलं प्रेम खुलेआम व्यक्त करणार आहे. त्यामुळे यावर अनिरुद्धसह देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया कशी असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करणार का ?हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.