उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना तातडीने फोन करुन भेटायला बोलावले (फोटो - फेसबुक)
Tanaji Sawant Eknath Shinde Meet : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील अनेक नेते हे चर्चेमध्ये आले आहेत. काही नेते त्यांनी केलेल्या वकत्व्यांमुळे चर्चेत आहे तर काही नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची देखील नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर तानाजी सावंत यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेटायला बोलावले.
काही दिवसांपूर्वी राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. याकडे देखील तानाजी सावंत यांनी पाठ फिरवली होती. ते पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा असल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सामील झाले नव्हते असे बोलले जात होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करुन तानाजी सावंत यांना फोन करुन मुंबईमध्ये बोलावून घेतले. आमदार तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भेटीचे फोटो देखील शेअर केले आहे. तानाजी सावंत यांनी लिहिले आहे की, “शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज मुंबई येथे तातडीने भेटीचा निरोप आला. या निरोपानिमित्त तात्काळ मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतली. साहेबांसोबत तब्बल 2 तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे. या भेटीमुळे तानाजी सावंत यांची नाराजी दूर झाल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुप्रिया सुळे यांचे मटण खाण्याच्या विधानावरुन वाद
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत यापूर्वी देखील नॉन व्हेज खाण्यावर वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावर वक्तव्य केले आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, ‘मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिलं खोल कर चलो. खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय? असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावर वक्तव्य केले आहे.