(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटाला सातासमुद्रापार अव्वल स्थान मिळवून देणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांच्या ‘सैराट’ या सिनेमामुळे मराठी सिनेमाचं चित्रच बदललं आहे. मराठी सिनेसृष्टीला 100 कोटींचा सिनेमा देणाऱ्या नागराज मंजुळे यांचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. नागराज मंजुळे हे रात्री वॉचमनच काम करत असे. आणि दिवसा इस्त्रीचं काम करून त्यांनी पैसे कमावले आहेत. तसेच आज त्यांचा ४८ वा वाढदिवस आहे. याच खासनिमित्ताने आपण त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल जाणून घेणार आहोत.
‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral
नागराज मंजुळे यांचा जन्म २४ ऑगस्ट १९२२ साली झाला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात जन्मलेल्या नागराज मंजुळे यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती. जुन्या चालीरीती, परंपरांनुसार नागराज बारावीत असताना त्यांचं लग्न लावून देण्यात आले होते. नागराज मंजुळे यांना अभ्यासात काही रस नव्हता. चित्रपटांकडे त्यांचा सर्वाधिक ओढा होता. शाळेचं दप्तर मित्राकडे ठेवून ते सिनमा पाहायला जात असे, त्यांना नवनवीन चित्रपट पाहण्यास खूप आवडत असे.
नागराज हे त्यांच्या घरात सर्वाधिक शिकलेले एकमेव व्यक्ती आहेत. परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. MA आणि MFil पूर्ण केले. पण सिनेमाचं खुळ त्यांच्या डोक्यातून काही जाता जात नव्हतं. त्यामुळे त्यांनी मास कम्युनिकेशनचा कोर्स केला. प्रोजेक्ट म्हणून पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म केली ज्याला पुढे जाऊन राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
नागराज यांना लिखाणाची देखील प्रचंड आवड होती. कविता लिहिणं हा तर त्यांचा छंद होता. चित्रपट बनवायचा म्हणजे त्यांना पैसा लागतो. सुरूवातीच्या काळात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अशा अडथळ्याच्या वेळी त्यांनी रात्री वॉचमन म्हणून काम केलं. दिवसा ते लोकांच्या कपड्यांनी इस्त्री देखील करून द्यायचे. लोकांचे कपडे इस्त्री करण्यापासून ते अमिताभ बच्चन सारख्या महानायकाबरोबर स्टेजवर झळकण्यापर्यंचचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
२०१० मध्ये आलेल्या पिस्तुल्या या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर २०१३ साली आलेल्या फ्रँड्री सिनेमाचाही राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला. नंतर सैराट चित्रपट आला आणि नागराज मंजुळे यांची यशस्वी घोडदौड पुढे सुरू राहिली. सैराट हा मराठीत 100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला. या चित्रपटाला ६९ वा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.