बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा प्रेक्षकांचा अत्यंत लाडका शो आहे. मात्र यंदाचं बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात थोडंसं कमी पडलं. कलर्स मराठीवरील हा कार्यक्रम (Colors Marathi) अखेर आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
बिग बॉस मराठी हा कार्यक्रम दोन आठवड्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे एका घरातला १६ जणांचा १०० दिवसांचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम मागे पडला होता. त्यामुळे या कार्यक्रमात अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न चॅनलने केला. मात्र फारसा फरक पडला नाही.
आता हा कार्यक्रम संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता ग्रँड फिनालेची चाहत्यांना उत्सुकता आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा 8 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर होणार आहे.
बिग बॉसच्या घरात आता फक्त सात सदस्य राहिले आहेत. यात किरण माने (Kiran Mane), प्रसाद जवादे (Prasad Jawade), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), राखी सावंत (Rakhi Sawant), आरोह वेलणकर (Aroh Welankar) या सदस्यांचा सहभाग आहे. या आठवड्यात दोन सदस्य प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतात.