गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा 'या' महत्वपूर्ण गोष्टी
कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. जगभरात कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कॅन्सर सारखा आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे काहीवेळा गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करावा. आहारात केलेल्या बदलांमुळे महिनाभरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.(फोटो सौजन्य – istock)
उतारवयात इम्युनिटी चांगली राहण्यासाठी सर्वांत गरजेचा आहे तो आहार. नियमित आहारात व्हिटॅमिन सीयुक्त फळे, लिंबू, मोसंबी, संत्री, आवळा, टोमॅटो आदींचा समावेश केला गेला पाहिजे. प्रतिकारशक्तीसाठी झोप महत्त्वाची असून रोज पुरेशी झोप घेतली गेली पाहिजे. याखेरीज आले घालून तयार केलेला चहा प्यायला पाहिजे. तसेच जेवणातही आल्याचे प्रमाण रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.
आतड्यातील बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी दैनंदिन आहारात दही, ताकाचा समावेश केला पाहिजे, परंतु दही आणि ताकाचे प्रमाण रात्रीच्या जेवणात अधिक प्रमाणात असू नये.रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायामामही महत्वाचा आहे. दररोज सकाळी व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. या व्यतिरिक्त, शरीरातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी कार्य व्यायाम केल्यामुळे होते.
काही काळ व्यायाम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. धावणे, पोहणे, व्यायाम करणे आणि वजन उचलणे यासारखे एरोबिक व्यायाम रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत.ताण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रतिकूल परिणाम करतो. शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून दररोज १० मिनिटे योगासने करा. याने ताणतणाव येणार नाही. प्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल.
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. दररोज अर्धा तास वेगाने चालल्याने वजन कमी होते. या व्यतिरिक्त आपले चयापचय आणि हृदय गती वाढते.शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे तहान लागल्यावर पाणी प्यायले पाहिजे. तसेच दिवसभरात किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे.






