अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर, बिग बॉसच्या घरात काय असणार ट्विस्ट ?
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन आता जवळपास महिना झाला आहे. १६ स्पर्धकांपासून हा खेळ सुरू झाला. बिग बॉसच्या १६ पैकी चार स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहे. किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना रुडाकोव्हा असे चार स्पर्धक घराबाहेर गेलेले आहेत. आज पाचव्या आठवड्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर घराबाहेर गेली असल्याचे प्रोमो दिसत आहे. प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून खरंच अंकिता बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार का ? अशी सध्या चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – जुई गडकरीला नेमकं झालं तरी काय ? अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण
चौथ्या आठवड्यापासूनच बिग बॉसच्या घरातल्या खेळात मोठा ट्वीस्ट आला. निक्कीने टीम A सोडल्यानंतर स्वत:चा वेगळा ग्रुप क्रिएट केल्यानंतर घरातल्या गेममध्ये एक वेगळाच ट्वीस्ट आला होता. एका बाजुला निक्की आणि अभिजीत तर दुसऱ्या बाजुला उरलेली १० जणांची टीम. चौथ्या आठवड्यापासून जुनी टीम A आणि टीम B एकत्र झाली आहे. पाचव्या आठवड्यात अंकिता वालावलकर घरातून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. सहाव्या आठवड्यामध्ये कदाचित बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
जर अंकिता खरोखरंच घरातून बाहेर गेली, तर घरातल्या इतर स्पर्धकांना आपल्या खेळात बदल करावा लागणार आहे. जस जसे स्पर्धक घराबाहेर जात आहेत तसतसं इतर स्पर्धकांना घरातले आपले स्थान पक्के करण्यासाठी फार झगडावे लागणार, हे शोच्या सुरूवातीलाच रितेश देशमुख बोलला होता. गेल्या अनेक दिवसांपासून घरात वाईल्ड कार्डची एन्ट्री झालेली नाही. एक महिन्यानंतर आता कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.