सौजन्य- पुरूषोत्तम पाटील इन्स्टाग्राम
अनेक सेलिब्रिटी असो किंवा सोशल मीडिया एन्फ्लूएंसर्सना असो बिग बॉसच्या घरातून लोकप्रियता मिळाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे. यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून मराठमोळे सेलिब्रिटी तर आले आहेतच. शिवाय सोशल मीडिया एन्फ्लूएंसर्सनेही यावेळी सहभाग घेतला आहे. किर्तनकार पुरूषोत्तम दादा पाटील ह्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली आहे. ते देखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पण पहिल्याच आठवड्यात कमी मतं मिळाल्यामुळे एलिमिनेट झाले.
जरीही पुरुषोत्तम पाटील पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाले असले तरीही त्यांचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. ‘बिग बॉस मराठी’ पाहणाऱ्या परदेशी चाहत्याने पुरुषोत्तम यांना भेटण्यासाठी थेट जपानहून आळंदी गाठली आहे. पुरुषोत्तमदादा पाटील यांनी इन्स्टाग्रामवर जपानी चाहत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओपाहून चाहते पुरूषोत्तम यांचं कौतुक करीत आहेत. पुरूषोत्तम पाटील मोजकेच काही दिवस बिग बॉसच्या घरात राहिले तरीही त्यांचा चाहतावर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंतच नाही तर जगभरात पोहोचले आहे.
“बिग बॉस कार्यक्रमाची लोकप्रियता…हा क्यूहे जपानचा आहे. बिग बॉस मराठीच्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचे भाग पाहून मला भेटायला आला आहे. माझे मित्र ईश्वर आणि प्रियांका यांच्याबरोबर तो भेटायला आला… रामकृष्ण हरी, जय शिवराय”, असं कॅप्शन देत पुरुषोत्तम पाटील यांनी जपानी चाहत्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्वत: पुरुषोत्तम पाटील आणि त्यांचा परदेशी चाहता दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पुरुषोत्तम पाटील म्हणतात, “रामकृष्ण हरी… माझ्यासोबत क्यूहे आहे. हा जपानचा आहे. त्याने बिग बॉसचे काही (Bigg Boss Marathi) एपिसोड्स पाहिले. ते एपिसोड्स पाहून तो आज मला आळंदीत भेटायला आला आहे.”
पुरुषोत्तम पाटील शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, “माझे मित्र ईश्वर आणि प्रियंका यांच्यासोबत तो आळंदीत आला आहे. खरं मला असं वाटतं की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून काय साध्य झालं? जर असं कोणी मला विचारलं, तर मी असं म्हणेल की, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून असे काही मित्र माझ्या जीवनात येत आहेत. हेच साध्य झालं. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.” यावेळी पुरुषोत्तम पाटील यांचा परदेशी चाहताही व्हिडिओमध्ये ‘रामकृष्ण हरी…’ बोलताना दिसत आहे. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रसिद्धीचे चाहते तुफान कौतुक करीत आहेत.






