(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व गाजवणारा आणि सोशल मीडियावर आपल्या रिल्सने धमाका करणारा सुरज चव्हाण आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची नुकतीच तयारी सुरु झाली असून, सुरजने नवीन घरात गृहप्रवेश देखील केला आहे. सुरज लवकरच लग्न करणार असून, त्यापूर्वी त्याने त्याच्या नवीन घरात प्रवेश केला आहे. सुरज चव्हाणने गृहप्रवेशाचा एक सुंदर व्हिडीओ आणि नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच सुरजचे चाहते त्यांचे नवीन घरासाठी अभिनंदन करत आहेत.
सुरज चव्हाणच्या नवीन घराची झलक
सुरज चव्हाणने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याच्या नवीन घराची संपूर्ण झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. प्रशस्त हॉल या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर मॉड्युलर किचन, प्रशस्त खोल्या आणि घराचा सुंदर रंग पाहायला मिळाला आहे. घराचं इंटिरियर खूपच सुंदर केले आहे. एकूणच सूरजचे हे स्वप्नातलं घर म्हणजे आलिशान बंगल्यासारखं दिसत आहे. सुरज चव्हाणने घराचा व्हिडीओ शेअर करत “आज केला माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश” असे कॅप्शन देखील लिहिले आहे.
सुरज चव्हाण आहे तरी कोण?
सुरज चव्हाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नवीन घरासाठी त्याचं अभिनंदन करत आहे. सुरज चव्हाण हा मूळचा बारामती तालुक्यातील मोढवे या गावातला आहे. सुरज रीलस्टार म्हणून लोकप्रिय झाला, पण त्याला राहायला घर नव्हते. यानंतर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आला चाहत्यांचे मन जिंकले आणि विजेता देखील झाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला घर बांधून देणार असे देखील म्हटले. आता वर्षभरात त्याचं नवीन घर तयार झालं असून सुरजने गृहप्रवेश केला आहे.
PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान
सुरज चव्हाण आता लवकरच अडकणार लग्नबंधनात
तसेच, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचे नशीब आणखी चमकले. सुरज चव्हाणने केदार शिंदे यांच्यासोबत मराठी चित्रपटामध्ये काम देखील केले. झापुक – झुपुक असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटामुळे त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आता सूरज लग्न करणार हे जाणून त्याचे चाहते आणखी खुश झाले आहेत. तसेच त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा देखील चाहत्यांना दाखवला आहे. आणि त्याच्या केळवणाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
Ans: सुरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि रिल्सस्टार
Ans: सुरज चव्हाणने केदार शिंदे यांच्यासोबत मराठी चित्रपटामध्ये काम देखील केले. झापुक - झुपुक असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटामुळे त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली






