फोटो सौजन्य - कलर्स मराठी
बिग बॉस मराठीचा सध्या पाचवा सीझन प्रचंड चर्चेत आहे. यंदाचा सीझन खास चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे, बिग बॉसचा कोणताही सीझन हा १०० दिवसांचाच असतो. पण हा सीझन मात्र त्याला अपवाद ठरला आहे. ७० दिवसांतच बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आहे. सध्या या सीझनचा अंतिम टप्पा सुरु आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बिग बॉस स्पर्धकांसाठी मनोरंजक टास्क आणत आहे. आता बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने नवा एक बिग बॉसचा आवडता टास्क आणला आहे तो म्हणजेच फ्रीझ आणि रिलीज.
हे देखील वाचा – बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार नात्यांचा खेळ, स्पर्धक होणार भावुक
प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांसाठी हा टास्क असतो. या टास्क दरम्यान, जेव्हा बिग बॉस फ्रीझ सांगितली तेव्हा सर्व स्पर्धक जिथे असतील तिथे उभे राहतील आणि हालचाल न करता स्टॅच्यूच्या पोझमध्ये उभे राहतील. यावेळी बिग बॉस घरातील स्पर्धकाच्या घरच्यांना घरामध्ये पाठवतात. आता ह्या टास्कचे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या टास्क दरम्यान, आजच्या एपिसोडमध्ये गायक अभिजीत सावंतचे नातेवाईक बिग बॉसच्या घरात येणार आहेत. फ्रीझ आणि रिलीज या टास्कवेळी अभिजीतची पत्नी आणि त्याचे मुलं घरामध्ये आले होते. यावेळी आपल्या कुटुंबाला पाहताच अभिजीत भावुक झाला आणि त्यांना मिठी मारली.
त्याच्या पत्नीने बिग बॉसच्या घरात अभिजीतला भेटल्यानंतर बिग बॉस मराठीचे आभार मानले आहेत. पोस्ट शेअर करत तिने त्यांचे आभार मानले आहेत. अभिजीतची पत्नी शिल्पा हिने, बिग बॉसच्या घरातला प्रोमो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिने लिहिलंय की, “सर्वात आधी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आम्हाला बोलावल्याबद्दल ‘कलर्स मराठी’वाहिनीचे आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार! इतक्या दिवसांनंतर अभिजीतला बघून खूपच छान वाटलं. आम्हाला भेटल्यावर तो आता अजून स्ट्राँगली गेम खेळेल हे नक्की! तो खूप जास्त स्ट्राँग माणूस आहे. आजचा फॅमिली स्पेशल एपिसोड बघायला विसरू नका आणि आपल्या अभिजीतला भरभरून व्होट्स करा!”
सध्या फॅमिली विक सुरु आहे. या वीकमध्ये, पहिल्याच एपिसोडमध्ये अभिजीतचे कुटुंबीय येणार आहेत. आता यानंतर कोणकोणत्या स्पर्धकांचे नातेवाईक येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. स्पर्धकांचे नातेवाईक घरात आल्यानंतर त्या सदस्यांना आणि इतर सदस्यांना काय काय सल्ला देणार ? हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.