बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या सीझनचा फिनाले येत्या काही दिवसांमध्ये लोकांना पाहायला मिळणार आहे. घरात आता एकूण सात स्पर्धक बाकी आहेत. या सातही स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी लढत सुरु आहे. काल झालेल्या नॉमिनेशन (Bigg Boss Marathi Nomination Task) प्रक्रियेत काही स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. काही स्पर्धक थेट फिनालेमध्ये पोहोचले आहेत.
नुकताच घरात एक वाद झाला आहे. या वादात अक्षयच्या बेडवर घरातील एका स्पर्धकाने अंड फोडून टाकलं आहे. यावरून अक्षय घरातल्या स्पर्धकांना प्रश्न विचारतोय. हा स्पर्धक नेमका कोण आहे? याबाबत मात्र, उत्सुकता आहे. अक्षयला राखीवर संशय असल्या कारणाने घरात राखी आणि अक्षयमध्ये वाद होतात. या वादात अक्षय राखीवर निशाणा साधतो. तसेच, राखीला जाब विचारताना दिसतो. मात्र, राखी या गोष्टीला नकार देते. मात्र, राखीला हे काम कोणी केलं आहे ते माहित आहे. आता तो सदस्य नेमका कोण आहे? या सगळ्यात राखीचा तर हात नाही? हे लवकरच समोर येईल.
[read_also content=”सेटवर अभिनेत्री हिमांशी खुरानाच्या नाकातून रक्तस्त्राव – प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/entertainment/punjabi-actress-himanshi-khurana-hospitalized-in-romania-while-shooting-her-film-nrsr-357317/”]
बिग बॉसच्या घरात नुकतेच या आठवड्याचे नॉमिनेशन पार पडले. प्रसाद जवादे, अमृता धोंगडे आणि राखी सावंत हे स्पर्धक घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले तर किरण माने, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर, अक्षय केळकर हे सदस्य फिनालेमध्ये पोहोचले आहेत.