'मला वाटले की मी भिकारी आहे आणि ती...', गोविंदाने दुसऱ्या मुलीच्या मृत्यूदरम्यान घडलेल्या घटनेचा सांगितला किस्सा
गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या लग्नाला चार दशकांहून अधिकचा काळ लोटला आहे. १९८७ मध्ये गोविंदा आणि सुनीताचे लग्न झाले असून त्यांना मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन असे दोन पालक आहेत. गोविंदाला पहिली मुलगी टीना ही १९८९ मध्ये झाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की टीनाच्या जन्मानंतर गोविंदा आणि सुनीताला दुSसरी मुलगी झाली. पण जन्मानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. मृत मुलीचा मृतदेह नर्मदा नदीत फेकण्यासाठी गोविंदा गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याला भिकाऱ्यासारखे वाटू लागले, असं त्याने एका शोमध्ये सांगितलं आहे.
प्रेक्षकांच्या मनाला लायटिंग करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत, “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!
अभिनेत्याचा किस्सा फार कमी लोकांना माहिती आहे. दरम्यान, गोविंदाने आपल्या लेकीचा किस्सा ‘जीना इसी का नाम है’ या शोमध्ये सांगितला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गोविंदाने सांगितलं की, “जेव्हा माझी मुलगी राणी हिचा जन्म झाला, तेव्हा ती फारच अशक्त होती. बाळ अशक्त असल्यावर कोणत्याही कुटुंबासाठी तो काळ खूप दुःखाचा क्षण असतो. माझी मुलगी अशक्त होती. डॉक्टरांना सांगितलेल्या वेळेच्या आधीच तिचा जन्म झाला होता. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की, गुजरातमध्ये नर्मदा नदी आहे, तिथे जाऊन तिला सोडून ये.”
तृप्ती डिमरीला Aashiqui 3 मधून का काढलं? दिग्दर्शक अनुराग बसू यांनी जरा स्पष्टच सांगितलं…
गोविंदाने तेच केले. आईच्या सांगण्यावरून नवरात्रीच्या ९व्या दिवशी मुलीच्या निर्जिव शरीराला मांडीवर घेऊन तो नर्मदा नदीच्या काठी पोहोचला. तो जात असताना त्याला रस्त्यात एक भिकारी महिला दिसली, जी तिच्या मांडीवर छोट्या बाळाला घेऊन रस्त्यावर भीक मागत होती. तिने गोविंदाच्या गाडीची काच बोटाने ठोकली आणि त्याकडे भीक मागत होती. गोविंदाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा भिकारी महिलेने मी निर्जीव बाळाला आपल्या मांडीवर घेऊन जाताना पाहिले तेव्हा तिने आपल्या मुलाला मांडीवर मिठी मारली. गोविंदा पुढे म्हणाला, ‘तिने आपल्या मुलाला उचलले आणि माझ्याकडे धावत आली. त्यावेळी मला मी भिकारी आहे आणि ती शिक्षिका आहे असे वाटले. आयुष्यही तसंच आहे, तुमच्याकडे जेव्हा प्रसिद्धी असते तेव्हा तुम्हाला भिकाऱ्यापेक्षा वाईट दाखवतं आणि कधी कधी अत्यंत गरिबी आणि असहाय्यतेतल्या राजापेक्षाही वाईट गोष्टी दाखवतं.