फोटो सौजन्य- जयदिप अहलावत इन्स्टाग्राम
जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat) हे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपट आणि ओटीटीमध्ये नवीन किंवा न ऐकलेले नाव नाही. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमधील हाथीराम चौधरीच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या मनात पोहोचला. पण आपल्या दमदार अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनातही आपलं स्थान निर्माण केलं आहे. जयदीप अहलावतने आपल्या फिल्मी करियरमध्ये नकारात्मक आणि सकारात्मकसह सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी त्याला चाहत्यांची पसंतीही मिळाली आहे. अशा बहुआयामी कलाकाराचा आज वाढदिवस आहे.
नीना गुप्ताने महाकुंभामध्ये केलं शाही स्नान, केलं योगी सरकारचं कौतुक
जयदीप अहलावत हा हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहम येथील खरकाडा गावचा रहिवासी आहे. २००५ मध्ये त्याने महर्षी दयानंद विद्यापीठातून इंग्रजी विषयातून एम.ए.ची पदवी प्राप्त केली. जयदीप अहलावतला भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचे होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही तो एसएसबी मुलाखत उत्तीर्ण होऊ शकला नाही, तेव्हा त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. जयदीपने पंजाब आणि हरियाणामध्ये स्टेज शो केले आणि पदवीनंतर त्याने अभिनय गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. कोणत्याही गॉडफादरशिवाय कठीण मार्गावर चालत त्याने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले.
दरम्यान, एका मुलाखतीत स्वत: जयदीप अहलावतने सैन्यात भरती होण्याची मनापासून इच्छा व्यक्त केली होती. त्याने सांगितले होते की, “मला अभिनयात नाही तर सैन्य दलामध्ये रस आहे. माझं बालपणापासून सैन्य अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी मी तयारी करून परीक्षाही दिली होती. मात्र, मी ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही. त्यानंतर मी अभिनयाकडे वळालो. सुरुवातीला मला अभिनय क्षेत्रात फारसा रस नव्हता. पण, जेव्हा मी स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली, तेव्हा मला अभिनयात मजा येऊ लागली आणि मग मी ठरवले की, आता मला अभिनयातंच जीव लावून काम करायचं.”
२००८ मध्ये त्याने देशातील लोकप्रिय संस्था फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून पदवी प्राप्त केली. एफटीआयआयमधील त्याच्या बॅचमेटमध्ये प्रतिभावान अभिनेते विजय वर्मा, सनी हिंदुजा आणि राजकुमार राव यांचा समावेश होता. जयदीपने २००८ मध्ये ‘नर्मीन’ या शॉर्ट फिल्ममध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, त्याला अजय देवगणचा ‘आक्रोश’, अक्षय कुमारचा ‘खट्टा मीठा’, रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका मिळू लागल्या. तथापि, ओटीटी प्लॅटफॉर्मही त्याच्यासाठी खास ठरला, चित्रपटाप्रमाणेच ओटीटीवरही त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले.
‘द ब्रोकन न्यूज’, ‘द बार्ड ऑफ ब्लड’, ‘ब्लडी ब्रदर्स’ आणि ‘पाताल लोक’ या प्रोजेक्टने जयदीपला आपली विशेष ओळख दिली. याशिवाय, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ (Gangs of Wasseypur) या वेब सीरिजमध्ये जयदीप अहलावतने एक छोटी भूमिका साकारली होती. या छोट्या भूमिकेतून त्याच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. शिवाय त्याच्या अभिनयाचेही प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्यानंतर जयदीपने ‘गब्बर इज बॅक’, ‘रईस’ आणि ‘राझी’मधील त्याच्या कामाची प्रेक्षकांना दखल घेण्यासाठी भाग पाडले. पण, २०२० मध्ये, ‘पाताल लोक’ या वेब सीरिजने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. या वेब सीरिजमध्ये त्याने पोलीस इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीची भूमिका साकारली असून या भूमिकेत त्याला सर्वाधिक पसंती मिळाली होती. या भूमिकेसाठी त्याला गौरविण्यातही आले होते. अनुष्का शर्माची निर्मिती असलेली ही वेबसिरीज खूपच लोकप्रिय ठरली.
“‘छावा’चा भाग होण्यासाठी मी स्वतःला…”, चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?