(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दुसऱ्या सोमवारीही Dhurandhar 2 चा धबधबा; ‘KGF 2’ला दिली टक्कर, 900 कोटींपासून फक्त इतका दूर?
अनुपम खेर यांचे हे वक्तव्य
अभिनेते अनुपम खेर आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणाले की, ‘धुरंधर २’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ सारख्या चित्रपटांचे कौतुक केले पाहिजे. जे लोक त्यांना प्रोपगंडा चित्रपट म्हणतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFD) २०२६ मध्ये पत्रकारांशी बोलताना अनुपम म्हणाले, “माझ्या मते, जे लोक चित्रपटांना प्रोपगंडा म्हणतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. आपण त्यांच्यावर खूप जास्त ऊर्जा खर्च करत आहोत. ते निरुपयोगी लोक आहेत, ते असंबद्ध लोक आहेत.”
“लोक मूर्ख नाहीत.” – अनुपम खेर
अभिनेता अनुपम खेर पुढे म्हणाले, “लोक इतके मूर्ख नाहीत की ते रात्री १२ वाजताच्या शोला जातील आणि तो सिनेमागृह पूर्ण भरलेला असेल. लोकांना चित्रपट आवडतो म्हणून ते तो बघायला जातात. आणि मला वाटतं, जे लोक याला प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत, त्यांनी आता शांत राहावं.” ते असेही म्हणाले की, अंधाऱ्या हॉलमध्ये बसून चित्रपट पाहणाऱ्या लोकांवर हे अवलंबून आहे, पण हा एक व्यवसायसुद्धा आहे. “बरेच लोक चॅनल व्यवसायासारखे चालवतात; ते फक्त एक गोष्ट सांगण्यासाठी हे करत नाहीत. पण जर मी चित्रपट बघायला जात असेन, तर मला त्यातून काहीतरी मिळायलाच हवं.” या उद्देशाने ते जातात असे ते म्हणाले आहेत.
‘धुरंधर २’ मध्ये झळकले हे कलाकार
रणवीर सिंग व्यतिरिक्त ‘धुरंधर 2’ या चित्रपटात संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल सारखे कलाकार आहेत. आदित्य धर यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट आता भरभरून कमाई करत असताना तो पुढे काय कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






