भूमी पेडणेकर फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते ती अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठी देखील प्रसिद्ध आहे. सध्या ही ब्यूटी क्वीन गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे आणि तिथून अभिनेत्रीने तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर आग लावत आहेत. हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. भूमी पेडणेकरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अल्पावधीतच तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाहुयात अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो.
भूमी पेडणेकर गोव्यात व्हेकेशन करतेय एन्जॉय पहा फोटो (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भूमी पेडणेकर ही बी-टाऊनची फॅशन अभिनेत्री आहे, जी अनेकदा स्टाईल स्टेटमेंटसह प्रयोग करताना दिसते. तिची सोशल मीडिया फीड ग्लॅमरस आणि आकर्षित फोटोंनी भरलेली आहे.
अभिनेत्री कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होते तेव्हा ती तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. सध्या ती तिच्या जबरदस्त फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर याच फोटोंची चर्चा सुरु आहे.
भूमी पेडणेकर सध्या गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुट्टीतील तिचे जबरदस्त फोटो शेअर केले. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी पोज देताना दिसत आहे.
पहिल्या फोटोमध्ये भूमी पेडणेकर काळ्या रंगाच्या स्ट्रॅपलेस ब्रॅलेट आणि निळ्या स्कर्टमध्ये पोज देताना दिसत आहे. तसेच या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर आणि मोहक दिसत आहे.
तर, दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री स्विमिंग पूलचा आनंद लुटताना दिसत आहे. तसेच तिने तिच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचे सनग्लास्सेस देखील घातले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे.