(फोटो सौजन्य - अकाउंट)
‘बिग बॉस १६’ चा विजेता आणि प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या गूढ पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. कधीकधी एमसी स्टॅन इंस्टाग्रामवर ब्रेकअपची घोषणा करतो, तर कधीकधी तो मृत्यूसाठी प्रार्थना करताना दिसतो. एवढेच नाही तर तो सोशल मीडियावर रॅप सोडण्याबद्दल लिहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करतो. यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रॅपर एमसी स्टॅनवर एका महिला इन्फ्लुएंसरने आरोप केले आहेत. त्याने मुलींना इंटरनेटवर फ्लर्टी मेसेज केले आहे.
एमसी स्टॅनने इंस्टाग्रामवर मुलींना केले फ्लर्टी मेसेज
‘बिग बॉस १६’ च्या विजेत्यावर इंस्टाग्रामवर महिलेने फ्लर्टी मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर आता त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर लीक झाले आहेत. आता रॅपर एमसी स्टॅनने दोन महिला इन्फ्लुएंसरना असे मेसेज पाठवले की ते इंटरनेटवर विनोदाचे विषय बनले आहेत. रेह्या नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने स्वतः एमसी स्टॅनने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
MC Stan getting into an influencer’s DM LMAO
byu/Minimum-State-9020 inInstaCelebsGossip
इन्फ्लुएंसरने रॅपरच्या चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल केले
मसेजमध्ये रॅपरने तिला सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय तो दुसऱ्या मुलीचा नंबर मागून तिच्याशी फ्लर्ट करताना दिसतो आहे. आता रॅपर सोशल मीडियावरील मुलींच्या इनबॉक्समध्ये काय करत आहेत? हे पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक त्याच्या या वागणुकीवर भाष्य करत आहेत, तर काही लोक त्याला रमजान सुरू असल्याची आठवण करून देत आहेत. काही लोक रॅपर एमसी स्टॅनवर रागवता दिसत आहेत.
‘शो बंद करत आहोत…’ कॉमेडियन कुणाल कामराच्या शोच्या आयोजकांची तोडफोडीनंतर दिली प्रतिक्रिया!
वापरकर्ते रॅपरवर संतापले
स्क्रीनशॉट व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी रॅपरच्या वागण्यावर टीका केली, तर काहींनी त्याच्या सवयीला भयानकही म्हटले. “त्याला हे सगळं थांबवावं लागेल” असं एका वापरकर्त्याने टिप्पणी दिली. तर दुसऱ्याने लिहिले, “हे सर्वात लाजिरवाणे आहे.” दरम्यान, २०२४ मध्ये एमसी स्टॅनने त्याची दीर्घकाळची मैत्रीण बूबासोबत ब्रेकअपची घोषणा केल्यानंतर ही बातमी चर्चेत आली. त्याचे रिलेशनशिप स्टेटस शेअर करताना रॅपरने लिहिले, ‘मी सिंगल आहे’, असं लिहून त्याने त्याच्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे लक्ष वेधून घेतले.