फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : सध्या सोशल मीडियावर बिग बॉसचे प्रेक्षक आणि दिग्विजय राठीचे चाहते संतापले आहेत. दिग्विजय राठीला घराबाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये बिग बॉसने घरातल्या नात्यावर कालच्या भागामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. कालच्या भागात घरातील टाईम गॉड श्रुतिका अर्जुनला घरातल्या सदस्यांना शोमध्ये घरातल्या सदस्यांचे योगदान किती आहे यावर क्रमवारी द्यायला सांगितली होती. यामध्ये जे सदस्य शेवटचे सहा सदस्य असणार आहेत त्यामधील एका सदस्याला घराबाहेर काढण्यात आले होते. यामध्ये आठ सदस्यांनी दिग्विजय राठीचे नाव घेतले तर तीन सदस्यांनी यामिनी मल्होत्राचे नाव घेतले होते. तर शिल्पाने एडीन रोझचे नाव घेतले. त्यानंतर एविक्षांच्या वेळी करणवीर मेहरा, चुम दारंग, चाहत पांडे आणि शिल्पा शिरोडकर हे सर्वच भावूक होताना दिसले.
आता आगामी भागामध्ये शनिवारच्या वॉरमध्ये दिग्विजय राठी सलमान खान सोबत स्टेजवर दिसणार आहे. यामध्ये दिग्विजय राठीला आणि त्याच्या घरातल्या मित्रपरिवाराला सलमान खान टोचक प्रश्न करताना दिसणार आहे आणि त्यांच्या नात्यावर प्रश्न करणार आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो की, कोणीही विचार केला नव्हता की तू एवढ्या लवकर बाहेर येणार आहेस, अजूनही तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. शेवटून टॉप ६ मध्ये येणं हे कसं काय झालं? यावर दिग्विजय म्हणतो की, इथे लोक खूप लवकर बदलतात. दिग्विजय जो घराबाहेर झाला आहे त्यासंदर्भात मला चुम आणि शिल्पालां प्रश्न करायचे आहेत की, तुम्ही दोघींनी का नाही सांगितलं विशेषत चूम तू का नाही सांगितलं श्रुतिकालां की आपल्या गटातला आहे त्याला वाचवा. पण तुमचा फोकस तो नसून तुमचा फोकस करणला पहिल्या नंबर नेण्याचा होता. जर तुम्ही तुमच्या गटाला ग्रुप ग्रुप बोलत आहात आणि त्यानंतर गेल्यावर तुम्हाला दुःख होत असत. तर मग त्याच्या जाण्याच्या आधी वाचवण्यासाठी तुम्ही काय करता. तुमच्या बाहेर निघण्याच्या मागे कोण कोण जबाबदार आहे ते स्पष्टपणे सांग त्यांना समजू दे.
PROMO #BiggBoss18 #WeekendKaVaar#DigvijayRathee on stage after Elimination pic.twitter.com/xPZgbpK1CW
— The Khabri (@TheKhabriTweets) December 20, 2024
सोशल मीडियावर दिग्विजय राठी यांच्या एव्हिक्शन नंतर आता त्याचे चाहते त्याचबरोबर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. यावेळी त्यांनी दिग्विजय घराबाहेर झाल्यानंतर त्याच्या नावाचे X वर ट्रेंड चालवण्यात आला आहे. यामध्ये पहिला ट्रेंड “SALMAN BRING BACK DIGVIJAY” आणि दुसरा ‘PROUD OF YOU DIGVIJAY” असे आहेत. यामध्ये ५०० लाखाहून अधिक ट्विट X वर त्याच्या चाहत्यांनी केले होते. आता त्याला पुन्हा शोमध्ये बोलावले जाणार की नाही हे पाहणं मनोरंजक ठरेल आणि जर तो पुन्हा शोमध्ये आला तर त्याचा खेळ कसा आहे हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.