(फोटो सौजन्य - अकाउंट)
‘बिग बॉस १८’ मधील चुम दरांग आणि करण वीर मेहरा यांच्या बाँडिंगने प्रेक्षकांची मने जिंकली. घरात असताना, करणने चुमबद्दलच्या त्याच्या प्रेमसंबंधांबद्दल स्पष्ट सांगितले होते, परंतु चुमने तिच्या एक्स प्रेयसीशी समेट होण्याची शक्यता दर्शविली होती, ज्याच्याशी ती १० वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होती. या वर्षीच्या सुरुवातीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, करणने एकमेकांना किस करून एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आणि त्यांच्या नात्याची पुष्टी केली. तसेच या दोघांची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडू लागली.
‘लोक विसरतील, आमची गणनाही होणार नाही…’, सलमान-शाहरुख आणि स्वतःबद्दल काय म्हणाला आमिर खान ?
करणसोबतच्या नात्यावर चुमची प्रतिक्रिया
आता चुम करणसोबतच्या नात्यात असल्याचे नाकारत आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, ‘आमच्यात काहीही नाही, ती फक्त मैत्री आहे. भविष्यात जर आमचे काही झाले तर लोकांना ते कळेल. मी १४ तारखेला, व्हॅलेंटाईन डे रोजी काहीतरी पोस्ट केले आणि लोकांनी आमच्या नात्याची पुष्टी केली. असं काही नाहीये, नातं नाहीये. त्या नात्याचे नाव मैत्री आहे.’ असं ती म्हणाली आहे.
चुमने प्रेमाच्या दृष्टिकोनाबद्दल काय म्हटले?
याशिवाय, अभिनेत्री म्हणाली की बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तिला खात्री होती की ती कोणताही प्रेमाचा अँगल दाखवणार नाही. तिने जोर देऊन सांगितले की करण, शिल्पा शिरोडकर आणि दिग्विजय सिंग राठी यांच्याशी तिचे नाते पूर्णपणे नैसर्गिक आहे. “बाहेर येऊन आह्मी या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, की हे नातं काय आहे,” असं ती या मुलाखती म्हणाली आहे.
‘आता खरा गर्मीचा हंगाम सुरु झाला…’ सईचा Hot अवतार… तरुणांनो! एकदा पहाच
करणने दिली होतो कबुली
चुमने शेअर केलेल्या व्हॅलेंटाईन डे व्हिडिओमध्ये करणने प्रेमाची कबुली दिली. यापूर्वी, करणने चुमसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले होते आणि म्हटले होते की, ‘चुम आणि मी आता नव्याने सुरुवात करत आहोत. आपण बिग बॉसमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली होती तशीच सुरुवात करत आहोत, आपण भेटत आहोत, ‘हॅलो, हाय कसे आहात?’. असं तो म्हणाला. याचदरम्यान, ‘बिग बॉस १८’ मध्ये चुम चौथ्या स्थानावर बाहेर पडली, तर करण वीरने हा रिअॅलिटी शो जिंकला होता.