(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘वेंकी बॉक्स ऑफिस’च्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ने नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाईचा विक्रम प्रस्थापित केला असून ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड आधीच मोडल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘बाहुबली’चे निर्माता शोबू यारलागड्डा यांनी X वर लिहिले, “काल मी धुरंधर 2 द रिवेंज पाहिला आणि हे सांगण्याची गरज नाही की मला हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट सर्व विक्रम मोडत आहे आणि भारत तसेच जगभरात बॉक्स ऑफिसवर नवे मापदंड निर्माण करत आहे, हे पाहून आनंद झाला. संपूर्ण टीमचे अभिनंदन!” असे म्हणून त्याने या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
‘धुरंधर: द रिवेंज’ आणि Baahubali 2: The Conclusion यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली 2’ने नॉर्थ अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा विक्रम प्रस्थापित केला असून, या चित्रपटाने 20 मिलियन डॉलर्स (सुमारे 190 कोटी रुपये) पेक्षा अधिक कमाई केली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत ‘धुरंधर 2’ला हा विक्रम मोडता आलेला नसला, तरी तो त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
Yesterday I watched #Dhurandhar2TheRevenge and needless to say I loved it and thoroughly enjoyed the film! Happy to see it breaking all the records and setting new box office benchmarks in India and worldwide! Congratulations to the entire team! 👏🏼👏🏼 https://t.co/ATl3o3bNTu — Shobu Yarlagadda (@Shobu_) March 28, 2026
बॉक्स ऑफिस मोजोच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर 2’ने नॉर्थ अमेरिकेत आतापर्यंत 19.33 मिलियन डॉलर्स (सुमारे 183 कोटी रुपये) कमावले आहेत, तर पहिल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने या भागात 19.7 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. मात्र, सध्या थिएटर्समध्ये मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, हा सिक्वेल लवकरच नवा विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘धुरंधर 2’चे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर याने केली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असून, त्या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. ‘धुरंधर’ फ्रँचायझीचे एकूण कलेक्शन आता 2000 कोटींच्या जवळ पोहोचले असून, ते लवकरच Pushpa 2: The Rule या चित्रपटाचा विक्रम मागे टाकेल, असे म्हटले जात आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पंडोर आणि मानव गोहिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.






