(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या ‘धुरंधर 2: द रिवेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत जोरदार कमाई केली आहे. मंगळवारी या चित्रपटाने केवळ बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम मोडला नाही, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट बनण्याच्या दिशेनेही वाटचाल सुरू ठेवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या शेवटाकडे वाटचाल करत असतानाही कमाईचा वेग कायम ठेवला आहे.
बॉक्स ऑफिसवर दमदार पकड ठेवत, सॅकनिल्कच्या प्राथमिक अंदाजानुसार ‘धुरंधर 2’ने आतापर्यंत सुमारे 899.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे 13 व्या दिवशी भारतात 900 कोटींचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ चित्रपट पोहोचला आहे. चित्रपटाने दुसऱ्या मंगळवारी (13 व्या दिवशी) अंदाजे 27.75 कोटी रुपये कमावले, जे सोमवारी (25.30 कोटी) झालेल्या कमाईपेक्षा थोडी जात आहे.
‘धुरंधर 2’च्या कमाईत चढ-उतार
चित्रपटाच्या कमाईत वाढ असूनही ‘धुरंधर 2’च्या कलेक्शनमध्ये हळूहळू घट होताना दिसत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर, पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन 60 कोटींच्या कमाईत घट होऊन 50 कोटी आणि त्यानंतर 40 कोटींपर्यंत आले. दुसऱ्या आठवड्यात हे कलेक्शन सुमारे 20 कोटींच्या जवळ स्थिरावले आहे. आठवड्याच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘धुरंधर 2’ने पहिल्या आठवड्यात 674.17 कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या आठवड्याचे एकूण कलेक्शन अंदाजे 225.75 कोटी रुपये झाले आहे.
बॉक्स ऑफिसवर दमदार पकड कायम
वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत, सॅकनिल्कच्या अहवालानुसार चित्रपटाने एकूण 1,077.41 कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन गाठला आहे. परदेशात ‘धुरंधर 2: द रिवेंज’ने सुमारे 358 कोटींची कमाई केली असून, त्यामुळे चित्रपटाचा एकूण जागतिक कलेक्शन 1,435.41 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता हा चित्रपट 1,500 कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.
मराठी इंडी म्युझिक क्षेत्रात नव्या कलाकारांची लाट! ‘मिमा २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित
‘धुरंधर 2’ने केला आणखी एक विक्रम
चार महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत 840 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता आणि ‘पुष्पा 2’च्या 812 कोटींच्या रेकॉर्डला मागे टाकत सर्वात मोठा हिंदी चित्रपट ठरला होता. मात्र हा विक्रम जास्त काळ टिकला नाही, कारण ‘धुरंधर 2’ने अवघ्या 13 दिवसांतच नंबर 1 स्थान पटकावले. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने केवळ 12 दिवसांत सुमारे 818 कोटी रुपयांची कमाई करत नवा इतिहास रचला आहे.






