Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जादू तेरी नजर’ फेम अभिनेत्री खुशी दुबेने दिली कामाख्या मंदिराला भेट; मालिकेबाबत व्यक्त केले मत!

'जादू तेरी नजर' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरु झाली असून प्रेक्षकांना या मालिकेत अनेक रहस्य उलघडताना दिसणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2025 | 12:42 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

“जादू तेरी नजर- डायन का मौसम” या मालिकेसह नव्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करताना अभिनेत्री खुशी दुबे गुवाहाटीतील कामाख्या मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेऊन आली आहे. या मालिकेबाबत आपले मत मांडताना ती म्हणाली की, ‘मी गुवाहाटीतील कामाख्या मंदिराला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे”, अशा शब्दांत ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या मालिकेतील खुशी दुबे ऊर्फ गौरी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘तुमचे विचार घाण आहेत, म्हणूनच…’ सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर इलाहाबादियाला फटकारले!

नाविन्यपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या वेधक मालिकांकरता नावाजलेल्या ‘स्टार प्लस’ वाहिनीने ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या आगळ्यावेगळ्या मालिकेद्वारे पुन्हा एकदा आपले स्थान मनोरंजन वाहिन्यांमध्ये बळकट केले आहे. ही मालिका जादू, गूढता आणि दैव या संदर्भातील एक रंजक कथा आहे, जिथे दोन प्रमुख पात्रांचे जीवन अनपेक्षित पद्धतीने परस्परांशी जोडले जाते. विहानची भूमिका निभावणारा झेन इबाद खान, दावंश असून, खुशी दुबेने रीववंशी कुळातील गौरीची भूमिका साकारली आहे. तिच्या गूढ शक्तींनी, वाईट शक्तींशी लढणारी गौरी शक्तीचा आणि धैर्याचा दिवा ठरते. एकत्रितपणे, विहान आणि गौरी गूढ आणि जादूई दुनियेत मार्गक्रमण करणार आहेत.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या मालिकेत गौरीची शक्तिशाली भूमिका खुशी दुबेने जिवंत केली आहे. या मालिकेतील खुशीची गौरी ही व्यक्तिरेखा दैवी शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. वास्तव जीवनात, या अभिनेत्रीचा कामाख्या देवीवर दृढ विश्वास आहे आणि ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ ही तिची गूढ मालिका सुरू होण्यापूर्वी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेण्याची तिची मनोकामना होती. या मालिकेच्या गूढ जगात पाऊल ठेवताच, खुशीला कृतज्ञतेच्या भावनेपोटी कामाख्या देवीचा आशीर्वाद घ्यायचा होता. भारतातील सर्वात पुरातन आणि महत्त्वाच्या शक्तीपीठांपैकी एक असलेले कामाख्या मंदिर हे स्थापत्य वैभव आणि आध्यात्मिक महत्त्वाकरता प्रसिद्ध आहे. असे हे मंदिर खुशीला दैवी मार्गदर्शन मिळविण्याकरता एक परिपूर्ण ठिकाण आहे.

Fussclass Dabhade Movie: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची सातासमुद्रापारही क्रेझ कायम, एकूण कमाई किती

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या मालिकेतील खुशी दुबे ऊर्फ गौरी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली, “जादू तेरी नजर- डायन का मौसम या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानते आणि त्याकरता मी कृतज्ञ आहे. वास्तविक जीवनात, मी देवी कामाख्या देवीची एक समर्पित अनुयायी आहे, जी दैवी स्त्री शक्ती आणि सामर्थ्याचे मूलतत्त्व आहे. ‘जादू तेरी नजर- दयान का मौसम’ या मालिकेतून या रोमांचक नव्या प्रवासाला प्रारंभ करताना मी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे. या मालिकेची कथा जादूई आहे आणि कथानकाप्रमाणेच, कामाख्याच्या दैवी मंदिराला भेट दिल्यानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातही तीच जादू अनुभवायला आवडेल. दुर्दैवाने, माझ्या शूटिंगच्या वेळापत्रकामुळे, मी कामाख्या मंदिराला भेट देऊ शकले नाही. मात्र, कामाख्या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे आणि या नव्या उपक्रमाकरता देवीकडून आशीर्वाद घेण्याहून अधिक चांगला मार्ग कोणता असू शकतो?” असे ती म्हणाली. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर, ‘जादू तेरी नजर – डायन का मौसम’ ही मालिका १८ फेब्रुवारीपासून रात्री ८.१५ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Jaadu teri nazar dayan ka mausam star khushi dubey aka gauri i m keen to visit kamakhya temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • tv serial

संबंधित बातम्या

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण
1

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण

आधी ६ महिने थांबवले शूटिंग, नंतर १६ पट वाढवली फी; आता ‘या’ दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर व्यक्त केला संताप
2

आधी ६ महिने थांबवले शूटिंग, नंतर १६ पट वाढवली फी; आता ‘या’ दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर व्यक्त केला संताप

Ikkis Review: शहीद अरुण खेत्रपाल यांच्या भावाला Ikkis पाहून अश्रू अनावर; अगस्त्यला मारली मिठी, म्हणाले…
3

Ikkis Review: शहीद अरुण खेत्रपाल यांच्या भावाला Ikkis पाहून अश्रू अनावर; अगस्त्यला मारली मिठी, म्हणाले…

पुन्हा येत आहे The Kerala Story 2 ! दिग्दर्शकाने शूटिंग केले पुर्ण; जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट
4

पुन्हा येत आहे The Kerala Story 2 ! दिग्दर्शकाने शूटिंग केले पुर्ण; जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.