(फोटो सौजन्य - x अकाउंट)
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहबादियाला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात युट्यूबरला प्रश्न विचारला आणि म्हटले की समाजाची काही मूल्ये असतात. आता याचबाबत युट्यूबर प्रश्नांची उत्तर देत असल्याचे समोर आले आहे.
Chhaava: विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरूच; सोमवारी केली जबदस्त कमाई!
‘डोक्यातले घाणेरडे विचार शोमध्ये दिसले’
शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, त्याच्या मनात घाण आहे, जी यूट्यूब शोमध्ये उधळली गेली. सर्वोच्च न्यायालयाने विचारले आहे की, ‘समाजाची मूल्ये कोणती आहेत?’ हे पॅरामीटर्स काय आहेत, तुम्हाला माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाने प्रभावशाली रणवीर इलाहाबादिया यांच्या वकिलाला विचारले, ‘समाजात काही स्वयं-विकसित मूल्ये असतात. तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे.’ असे त्यांनी म्हटले आहे.
समाजाच्या नियमांविरुद्ध काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नाही.
या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादिया यांना सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही समाजाच्या नियमांविरुद्ध काहीही बोलण्याची परवानगी नाही. असे युट्यूबर रणवीर अलाहबादियाला सांगण्यात आले आहे.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकचा ‘जिलबी’ आता हिंदीत येणार, कधी आणि कुठे होणार रिलीज ?
सर्वोच्च न्यायालयाने विचारले- अश्लीलता आणि असभ्यतेचे निकष काय आहेत?
युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया यांनी समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये कुटुंब आणि पालकांबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. तो या कार्यक्रमात पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. त्यांच्या अश्लील टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादिया यांच्या वकिलाला विचारले की ‘अश्लीलता आणि असभ्यतेचे मापदंड काय आहेत?’ असे त्यांना विचारण्यात आले आहे.