Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ज्याने माझी एजन्सी सोडली…” जान्हवी कपूरने करण जोहरची सोडली साथ; अभिनेत्रीने कंपनीमधून घेतली माघार, म्हणाला…

अलीकडेच जान्हवी कपूरने करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीसोबतचे संबंध तोडले असल्याचे वृत्त समोर आले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर निर्मात्याने आपले मौन सोडले आहे. करण जोहर नक्की काय म्हणाला जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 22, 2026 | 12:54 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • जान्हवी कपूरने करण जोहरची सोडली साथ
  • अभिनेत्रीने कंपनीमधून घेतली माघार
  • करण जोहरने दिली प्रतिक्रिया
 

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील व्यावसायिक समीकरणात मोठा बदल झाल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जान्हवीने करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीसोबतचे संबंध तोडल्याची बातमी समोर आल्यानंतर इंडस्ट्रीत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र या सगळ्यावर करण जोहरने स्वतः प्रतिक्रिया देत परिस्थिती स्पष्ट केली आहे.

जान्हवी कपूरने करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन्स’च्या बॅनरखाली अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच करण जोहरने तिला मोठा प्लॅटफॉर्म दिला. त्यामुळे तिचा हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्याचा ठरला आहे. इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आणि नवीन संधींचा शोध घेण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

‘बकवास चित्रपट…’ म्हणत पाकिस्तानी कुटुंबाची ‘Dhurandhar 2′ वर टीका; भारतीय चाहत्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला की, “कलाकार येतात आणि जातात, हे या इंडस्ट्रीचा भाग आहे. तीन प्रमुख टॅलेंट एजन्सींमध्ये सतत स्पर्धा सुरू असते. एकमेकांचे टॅलेंट खेचण्याचा हा खेळ नवीन नाही.” त्याने आपल्या एजन्सीचा व्यवसाय चांगला चालत असल्याचाही उल्लेख केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, करण जोहरने कोणताही वाद निर्माण न करता अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. तो म्हणाला, “ज्यांनी आमची एजन्सी सोडली आहे, त्यांना मी नेहमी शुभेच्छा देतो. आमच्यातील नातं फक्त एजन्सीपुरतं मर्यादित नाही. भविष्यातही आम्ही एकत्र काम करू शकतो.”

या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, जान्हवी आणि करण यांच्यात कोणतीही कटुता नाही. उलट, व्यावसायिक निर्णय वेगळे असले तरी वैयक्तिक नातेसंबंध चांगलेच असल्याचे संकेत मिळतात. बॉलीवूडमध्ये अशा बदलांना सामान्य मानले जाते, कारण कलाकार सतत नवीन संधी आणि विविध प्रोजेक्ट्स शोधत असतात.

“मी खूप रडायचे,” श्रीलीलाने उघड केले इंडस्ट्री सोडण्यामागचे कारण; ट्रोलिंगबद्दलही दिले स्पष्टीकरण

जान्हवी कपूरसाठी हा टप्पा तिच्या करिअरमधील महत्त्वाचा वळण ठरू शकतो. नवीन एजन्सी आणि वेगळ्या प्रोजेक्ट्समुळे ती स्वतःला वेगळ्या भूमिकांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, करण जोहरसारख्या अनुभवी निर्मात्यासोबत भविष्यात पुन्हा तिची जोडी जमण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, हा बदल वादापेक्षा करिअरच्या नव्या दिशेचा भाग असल्याचे दिसते. आता प्रेक्षकांची नजर जान्हवीच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे लागली आहे, जिथे ती स्वतःची वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

Web Title: Janhvi kapoor exit from karan johar talent agency producer share update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • karan johar

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.