(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रणवीर सिंह विरुद्ध आलेल्या धमकीच्या फोनप्रकरणी तपास करणाऱ्या पथकाला एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तपासादरम्यान रणवीर यांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ऑडिओ संदेशातील आवाजाचा शोध लागल्याचे समोर आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला होता; मात्र चौकशीत हा आवाज गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याचा असल्याचा संशय पोलिसांनी आता व्यक्त केला आहे.
१० फेब्रुवारी रोजी रणवीर सिंहला पहिली धमकी मिळाली होती. IANSच्या वृत्तानुसार, रणवीर यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना हा आवाज हॅरी बॉक्सरशी साम्य दर्शवणारा असल्याचे आढळले आहे. या धमकीत अभिनेत्याकडे १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला होता.
अभिनेत्याच्या मॅनेजरला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकी
रणवीर सिंह यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली आहे. IANSने ट्विट करत म्हटले आहे की, “रणवीर सिंह यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचला लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित सक्रिय सदस्य हॅरी बॉक्सर याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे.”
हा व्हॉइस नोट नमुना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सीएनएन-न्यूज18 च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार सिंह यांच्या मॅनेजरला व्हॉट्सअॅपवर एक व्हॉइस नोट पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या व्हॉइस नोटमध्ये पाठवणाऱ्याने अभिनेत्याला धमकी देत खंडणीची मागणी केली होती. प्राथमिक तपासात या नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी साम्य दर्शवतो, असे आढळले आहे.
रणवीर सिंगकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली
रणवीर सिंह यांच्या मॅनेजरला ही धमकी व्हीपीएनचा वापर करून पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे, आणि तिचे लोकेशन परदेशात ट्रेस झाल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार तपास सुरू असून इंटरपोलचीही मदत घेतली जात आहे. १० फेब्रुवारी रोजी रणवीर सिंह यांना व्हॉट्सअॅपवर एक धमकीचा व्हॉइस नोट मिळाला होता, ज्यामध्ये त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती तसेच संपूर्ण स्टाफला संपवण्याची आणि गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी देण्यात आली होती. संबंधित व्यक्तीने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क)चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.






