(फोटो सौजन्य-Social Media)
‘पाताल लोक’ आणि ‘द बोकन न्यूज’ नंतर अभिनेता जयदीप अहलावतच्या हातात आणखी एक वेब सिरीज आहे. मात्र, यावेळी सेटवर त्याला इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये गणले जाणारे मनोज बाजपेयी यांचा सामना करावा लागणार आहे. जयदीप मनोज बाजपेयी स्टारर वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. मात्र, या शोमधील त्याच्या भूमिकेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. या शोमध्ये त्याची भूमिका खूप महत्त्वाची असणार हे निश्चित आहे. आणि हा अभिनेता मनोज बाजपेयी टक्कर देत मुख्यभूमीकेत दिसणार आहे.
देशाच्या ईशान्येकडील राज्य नागालँडमध्ये ही कथा असणार आहे
याशिवाय, तिसऱ्या सीझनमध्ये शोची कथा देशाच्या उत्तर-पूर्वेकडील राज्य नागालँडमध्ये जाईल, अशीही बातमी आहे. ज्यासाठी शोची टीम सध्या नागालँडची राजधानी कोहिमा येथे शूटिंग करत आहे. रिपोर्ट्सनुसार, शोची टीम सप्टेंबरच्या सुरुवातीला नागालँडला रवाना झाली होती आणि ऑक्टोबरपर्यंत तिथे शूटिंग सुरु राहणार आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील काही स्थानिक कलाकारांनाही या शोमध्ये कास्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे देखील वाचा- रजनीकांतच्या ‘लाल सलाम’ची ओटीटीवर एन्ट्री होणार, चियान विक्रमचा ‘थंगलान’ही देणार टक्कर; जाणून घ्या यादी…
मनोज बाजपेयीचे येणारे आगामी चित्रपट
अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. याआधी तो ‘भैय्या जी’मध्ये दिसला होता. जे पडद्यावर जास्त कमाई करू शकला नाही. या वर्षात आतापर्यंत त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यात ‘सायलेन्स 2’ आणि ‘द फेबल’ यांचा समावेश आहे. तसेच अभिनेता लवकरच नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे.