Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OMG 2 Movie: ‘OMG 2 ची मूळ कथा माझीच होती’, अक्षय कुमारने क्रेडिट दिलं नाही; परेश रावल यांचा मोठा दावा

'OMG 2' चित्रपटाची मूळ कथा माझीच होती, असा दावा अभिनेता परेश रावल यांनी केला आहे. अक्षय कुमारने श्रेय दिले नाही आणि ओरिजिनल स्टोरी बदलल्याचाही आरोप त्यांनी मुलाखतीत केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 10:37 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Paresh Rawal On Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेते परेश रावल सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच काही खुलासे केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी अक्षय कुमारवरही निशाणा साधला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या

जेव्हा २०२३ मध्ये ‘OMG 2‘ प्रदर्शित होणार होता, तेव्हा त्याला CBFC कडून मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. चित्रपटात धार्मिक विषय आणि लैंगिक शिक्षणाचे मिश्रण केल्याबद्दल आक्षेप घेण्यात आले होते. चित्रपटावर बंदी घालण्याचीही चर्चा होती. काही बदलांनंतर, OMG 2 ला ‘A’ प्रमाणपत्र मिळाले आणि तो प्रदर्शित झाला. अनेक संवाद आणि शब्द बदलण्यात आले होते. आता, परेश रावल यांनी त्या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. अभिनेत्याने सांगितले की, OMG 2 ही त्यांची कल्पना होती, पण अक्षय कुमारने त्यांच्याकडून पटकथा घेतली आणि त्यांना श्रेयही दिले नाही.

परेश रावल यांनी असाही दावा केला आहे की, जर निर्मात्यांनी त्यांच्या मूळ कथेला धरून काम केले असते, तर बराचसा वाद टाळता आला असता. अभिनेत्याचा दावा आहे की, त्यांची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित होती आणि त्यात कोणत्याही दैवी हस्तक्षेपाचा समावेश नव्हता. अक्षय कुमार या प्रोजेक्टचा भाग झाल्यानंतर या स्क्रिप्टमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आणि त्यामुळेच त्यांनी या चित्रपटातून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी नमूद केले आहे.

विकी लालवाणी यांना दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांनी दावा केला की, ‘OMG 2’ बनलेल्या चित्रपटाची मूळ कथा त्यांनीच तयार केली होती. त्यांनी ही कल्पना दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत शेअर केली आणि त्यांच्यासोबत मिळून पटकथा विकसित केली. मात्र, अक्षय कुमार या प्रोजेक्टमध्ये सामील झाल्यानंतर कथेने वेगळे वळण घेतले. परेश रावल यांच्या मते, कथेत देवाची कोणतीही भूमिका नव्हती. ते म्हणाले, “मी ‘रोड टू संगम’चे दिग्दर्शक अमित राय यांच्याशी संपर्क साधला आणि विचारले की ते दुसरा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत का. मी त्यांचा खूप आदर करतो. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे एक कल्पना आहे. चला एकत्र बसून ती लिहूया. मी त्यांना सांगितले की, जरी मी लेखक नसलो तरी, मी कल्पना देऊ शकेन आणि आपण कुठे चुकत आहोत हे ओळखायला मदत करू शकेन, कारण मला पटकथा काही प्रमाणात समजते.”

‘मी अभिनेता आहे, नेता नाही’, Sonam Wangchuk यांच्या मुद्द्यावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

परेश रावल यांनी पुढे स्पष्ट केले, “ही कथा एका मुलाची होती, ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य कठीण होते. त्याचे वडील खजुराहो मंदिरात पर्यटक मार्गदर्शक होते. अमितने त्याला महाकाल मंदिरात अर्धवेळ पुजारी होण्याचा सल्ला दिला. आम्ही एकत्र मिळून पटकथा तयार केली आणि त्यात तज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी यांचाही समावेश केला. आमच्या अनेक मिटिंग झाल्या, कारण आमचा उद्देश चित्रपट शैक्षणिक आणि मनोरंजक बनवण्याचा होता, अश्लील बनवण्याचा नाही. आम्ही या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होतो.”

स्वप्नील जोशीच्या घरी आली लक्झरी Tesla! व्हिडिओ शेअर करत दाखवली नव्या गाडीची झलक; किंमत ऐकून व्हाल थक्क

पुढे बोलताना परेश रावल यांनी सांगितले की, अक्षय सोबत माझं बोलण झाले तेव्हा त्याने मला हा चित्रपट करण्यास विनंती केली होती. पण मी त्याला नाही म्हणालो. मी जसा विचार केला होता तसा हा चित्रपट नाही. या कथेत ईश्वाराची काही भूमिका नव्हती. त्याने माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मी सुरूवातीपासूनच या पटकथेच्या प्रक्रियेत सहभागी होतो. त्यामुळे ही कथा नेमकी कशी असायाला हवं हे मला पक्कं ठाऊक होतं. म्हणून मी या चित्रपटातून बाहर पडलो. अखेर, या चित्रपटात वडिलांची भूमिका पंकड त्रिपाठी यांनी साकारली होती, तर अक्षय कुमार शिवाचा दूत म्हणून पडद्यावर दिसला.

Web Title: Omg 2 was originally my story akshay kumar didnt give me credit says paresh rawal in a shocking revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Entertainemnt News
  • OMG 2

संबंधित बातम्या

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण
1

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार
2

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार

Allu Arjun Fans: अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा मोठा उपक्रम; सात राज्यांत HPV लसीकरणाबाबत जनजागृती अभियान
3

Allu Arjun Fans: अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा मोठा उपक्रम; सात राज्यांत HPV लसीकरणाबाबत जनजागृती अभियान

Kriti Sanon: ‘संस्कृती कपड्यांत नाही..’; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननचं सडेतोड उत्तर
4

Kriti Sanon: ‘संस्कृती कपड्यांत नाही..’; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननचं सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.