( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Swapnil Joshi New Tesla Car: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वप्नीलने टेस्ला (Tesla) कंपनीची आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी केली असून, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नव्या गाडीची पहिली झलक दाखवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वप्नील जोशी त्याच्या कुटुंबीयांसह नवी कोरी कार खरेदी करण्यासाठी गेला होता. ही पोस्ट शेअर करताना त्याने त्याच्या भावना वक्त केल्या आहेत. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “मी लहान होतो तेव्हा माझे बाबा सायकल चालवायचे. त्यांना पाहताना एक दिवस माझ्याकडेही जगातील सर्वोत्तम सायकल असावी, असं स्वप्न मी पाहायचो. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि ते स्वप्न काळाच्या ओघात मागे पडलं. काही वर्षांनंतर लोक या कारला जगातील सर्वोत्तम कार म्हणू लागले आणि आज तीच कार माझ्या घरी आणण्याचं भाग्य मला लाभलं,”
स्वप्नील पुढे म्हणाला, “ही गाडी अमेरिकन आहे किंवा महागडी आहे म्हणून मी ती घेतलेली नाही. माझ्यासाठी ती भविष्याचं प्रतीक आहे आणि आज भारतात राहूनही ती अभिमानाने खरेदी करता येते, हीच मोठी गोष्ट आहे. मात्र, या कारपेक्षाही मोठा आनंद म्हणजे माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अभिमान, माझ्या मुलांच्या नजरेत त्यांच्या वडिलांबद्दल निर्माण झालेला आदर आणि माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं समाधान. तेच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. वेलकम होम, Tesla… कारण स्वप्नं नेहमी आपण जशी कल्पना करतो तशी पूर्ण होत नाहीत; कधी कधी ती आपल्या कल्पनेपलीकडच्या सुंदर पद्धतीने पूर्ण होतात.”
View this post on Instagram
स्वप्नीलचे कार कलेक्शन
स्वप्नीलकडे रेंज रोव्हर डिफेंडर देखील आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्वप्नीलने ही कार खरेदी केली होती. दरम्यान तीन वर्षांपूर्वी अभिनेत्याने जॅग्वार ही अलिशानही खरेदी केली होती.
Tesla Model YL ची किंमत किती?
स्वप्नील जोशीने खरेदी केलेल्या Tesla Model YL या इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे ६५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स, लांब पल्ल्याची बॅटरी रेंज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे Tesla Model YL ही जगभरातील लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV पैकी एक मानली जाते.
स्वप्नील जोशीच्या या नव्या लक्झरी कारची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, त्याचा व्हिडिओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.






