(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
टेलिव्हिजन अभिनेत्री युविका चौधरी आणि अभिनेता प्रिन्स नरुला लग्नाच्या अनेक वर्षांनी आता एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. यावर्षी करवा चौथच्या दिवशी अभिनेत्री युविका चौधरीने या गोड मुलीला जन्म दिला. आता या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव शेअर केले आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला युविका आणि प्रिन्सने त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवले आहे हे सांगणार आहोत. प्रिन्स आणि युविका यांनी त्यांच्या मुलीसाठी अकेलिन हे नाव निवडले आहे. हे नाव शीख धर्मानुसार ठेवण्यात आले आहे आणि या सेलिब्रिटी जोडप्याने त्यांच्या बाळाचे नाव त्यांच्या चाहत्यांसह इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एकलिन नावाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊयात.
काय आहे एकलिन नावाचा अर्थ?
एकलिन हे शीख नाव आहे आणि याचा अर्थ एकात लीन किंवा एकात्मतेत लीन असा होतो. एकलिन या नावाचे इतर अनेक अर्थ आहेत जसे की ज्ञानी, अभ्यासू, ज्ञानी, स्वतंत्र, निर्भय, पुरावा, आध्यात्मिक, रहस्यमय, अंतर्ज्ञानी आणि बुद्धिमान. प्रिन्सच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर हे नाव खूप पसंत केले आहे. आणि या पोस्टला चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद देखील दिला आहे.
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी लग्न केला. परंतु या आधी प्रिन्स आणि युविकाची बिग बॉस सीजन नऊ मध्ये एकमेकांची ओळख झाली आणि या नंतर त्यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात निर्माण झाले आणि हे दोघे एकत्र होऊन लग्नाच्या बंधनात अडकले. या नंतर त्यांच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. या साठी ते दोघेही खूप आनंदात आणि खुश आहेत. चाहते या दोघांना भरभरुन प्रेम देत आहेत.
धक्कादायक! विक्रांत मेस्सीने केली अभिनय सोडण्याची घोषणा, काही मिनिटांतच व्हायरल झाली पोस्ट!
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या नात्यात दुरावा?
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी हे टीव्हीवरील आवडते जोडपे आहेत. पण अलीकडेच त्यांच्या नात्याच्या अनेक बातम्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. रोडीज विजेता प्रिन्स नरुला नुकताच 34 वर्षांचा झाला आहे. 24 नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्याने आपल्या मुलीसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. प्रिन्सने पोस्टच्या खाली एक सुंदर कॅप्शनही लिहिले होते. या फोटोंमध्ये युविका चौधरी कुठेही दिसत नव्हती किंवा तिने प्रिन्सच्या वाढदिवसाची कोणतीही पोस्ट किंवा पोस्ट शेअर केला नाही आहे.