(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अक्षय कुमार आणि प्रियदर्शनची जोडी पुन्हा एकदा थिएटरमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे नाव “भूत बंगला” आहे आणि त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी अक्षय आणि प्रियदर्शन यांनी “हेरा फेरी”, “गरम मसाला”, “भागम भाग”, “भूल भुलैया”, “दे दाना दान” आणि “खट्टा मीठा” मध्ये एकत्र काम केले आहे.
७ जानेवारी रोजी, “भूत बंगला” च्या निर्मात्यांनी घोषणा केली की, “बंगल्यातून बातमी आली आहे. १५ मे २०२६ रोजी दरवाजे उघडणार आहेत. चित्रपटगृहात भेटूया.” हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी तयार केला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाचे काही भाग राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे शूट करण्यात आले आहेत, ज्यामुळे कथेला एक जबरदस्त व्हिज्युअल टच मिळतो. अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या चित्रपटात ही पॉवरहाऊस टीम एकत्र दिसणार असल्याने मनोरंजनाचा डोस प्रचंड असणार यात शंका नाही. याआधीही या टीमने अनेक क्लासिक कॉमेडी चित्रपट दिले आहेत, त्यामुळे आता ‘भूत बंगला’मध्ये ही मस्ती आणि धमाल किती जबरदस्त असेल याची कल्पना करा!
‘भूत बंगला’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
‘भूत बंगला’ च्या कलाकारांमध्ये अक्षय कुमार, मनोज जोशी, मनु मेनन, विंदू दारा सिंग, मिथुन चक्रवर्ती, तब्बू, वामिका गब्बी, परेश रावल, शहनाज गिल कॅमिओ (आयटम नंबर), जेमी लीव्हर, मिथिला पालकर आणि राजपाल यादव यांचा समावेश आहे. हे सगळे कलाकार मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहेत. तसेच हे सगळे प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”
अक्षयचे आगामी चित्रपट
या चित्रपटाव्यतिरिक्त, अक्षयकडे ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हैवान’ सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ‘हैवान’ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु, ‘भूत बंगला’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. अक्षय शेवटचा ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये दिसला होता. अक्षय २०२६ मध्ये टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. त्याच्या शोचे नाव ‘इंडियाज व्हील ऑफ फॉर्च्यून’ आहे. तो हा शो होस्ट करताना दिसणार आहे. तसेच हा शो प्रेक्षकांना सोनी टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.






