Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवा पैलू दिसेल’; Riteish Deshmukh ने ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगचा अनुभव केला शेअर, म्हणाला ‘अभिमान…’

अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच तो या चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे. या चित्रपटाबद्दल अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 11:10 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रितेश देशमुखने व्यक्त केला अभिमान
  • ‘राजा शिवाजी’च्या शूटिंगचा शेअर केला अनुभव
  • छत्रपती शिवाजी महाराज आजही लोकांची प्रेरणा
रितेश देशमुख आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘राजा शिवाजी’द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच ‘धुरंधर २’ सोबत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यामुळे चाहते चित्रपटासाठी अधिकच उत्सुक झाले आहेत. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखसाठी हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक प्रयत्न नसून, तो त्यांच्या महाराष्ट्रीयन मुळांशी जोडलेला एक अत्यंत वैयक्तिक प्रवास आहे. या महान योद्धा राजाची भूमिका साकारणे ही अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे, असे त्याला वाटते.

छत्रपती शिवाजी महाराज आजही लोकांची प्रेरणा

‘व्हेरायटी’शी बोलताना रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रभावाबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मराठी कुटुंबातील असल्याने, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा वाचत आणि ऐकत मोठे झालो. त्यांचे महत्त्व आजच्या पिढीसाठीही तितकेच खरे आहे. मला नाही वाटत की जगात त्यांच्यासारखे कोणी असेल. मी गुरू किंवा देवांबद्दल बोलत नाहीये. मी अशा एका राजाबद्दल बोलत आहे जो जवळपास ३५० वर्षांपूर्वी होऊन गेला, तरीही आजही लोक त्यांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत. ते आजही लोकांना प्रेरणा देत आहेत. एक असा राजा ज्याने एक अमर वारसा मागे ठेवला आहे, जो आजही प्रेरणा देत आहे.”

Latest Marathi Song : Pravin Koli चा ‘स्वामी समर्थ’ गाणं प्रदर्शित! अंकिता मेस्त्री झळकणार मुख्य भूमिकेत

रितेश देशमुख यांना शिवाजी महाराजांची कथा मोठ्या स्तरावर सादर करायची आहे. चित्रपटाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाले, “‘राजा शिवाजी’ हा एक मराठी द्विभाषिक चित्रपट आहे. आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्येही बनवण्याचा विचार करत आहोत. तो मोठ्या स्तरावर बनवणे हे आमचे ध्येय आहे. अनेकदा मराठी चित्रपटांची व्याप्ती मर्यादित असते. लोकसंख्येनुसार, महाराष्ट्रात अंदाजे १२० दशलक्ष लोक आहेत, त्यापैकी सुमारे १०० दशलक्ष लोक मराठी भाषिक आहेत. ही संख्या इतर अनेक राज्यांच्या किंवा देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. मात्र, बॉक्स ऑफिसचे आकडे हे दर्शवत नाहीत.”

आम्ही एक नवीन पैलू सांगण्याचा प्रयत्न करू

चित्रपटाची कथा आणि चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “कथेची सुरुवात तो एक साक्षीदार असल्यापासून होते, त्यानंतर तो प्रश्न विचारू लागतो आणि शेवटी तो त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेतो. आम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पूर्णपणे वेगळा पैलू उलगडत आहोत. ही जितकी एक ऐतिहासिक गाथा आहे, तितकीच ती एक कौटुंबिक कथासुद्धा आहे. एका वडिलांची, मुलाची, पतीची आणि भावाची कथा. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांचे निधन झाले, पण तोपर्यंत त्यांनी खूप काही साध्य केले होते. मी त्यांचे आयुष्य अडीच ते तीन तासांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

Manish Malhotra Mother Dies: बॉलीवूडवर शोककळा! गुढीपाडव्याच्या दिवशीच मनिष मल्होत्राला मातृशोक

‘राजा शिवाजी’ कधी होणार प्रदर्शित?

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखने केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मितीही केली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, जेनेलिया देशमुख, फरदीन खान, महेश मांजरेकर, भाग्यश्री आणि सलमान खान यांच्यासह मोठा स्टारकास्ट आहे. सलमान खान या चित्रपटात केमिओ मध्ये दिसणार आहे. ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

 

 

Web Title: Riteish deshmukh share working experience on raja shivaji says portraying chhatrapati shivaji maharaj is pride

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
1

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.