मनिष मल्होत्राच्या आईचे निधन (फोटो सौजन्य - Instagram)
मनीष मल्होत्रा आपल्या आईच्या खूप जवळ होते आणि अनेकदा त्यांना आपली प्रेरणा मानत असत. ते सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो वारंवार शेअर करत आणि लिहित असत की, त्यांची आई त्यांची सर्वात मोठी ताकद आणि सोबती होती. मातृदिनानिमित्त एका पोस्टमध्ये त्यांनी गरिमा मल्होत्रा यांना आपल्या कारकिर्दीतील आणि आयुष्यातील सर्वात महत्त्वाची प्रेरणा म्हटले होते.
बॉलीवूडचे मित्रमैत्रिणी मनिषच्या घरी
गरिमा मल्होत्रा यांच्या निधनाची बातमी कळताच, चित्रपट आणि फॅशन जगतातील अनेक सेलिब्रिटींनी मनीष यांच्या घरी भेट दिली. करिश्मा कपूर आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी वैयक्तिकरित्या भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही या कठीण काळात सोशल मीडियावर मनीष मल्होत्रा यांच्याप्रती शोक व्यक्त केला आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
गरिमा मल्होत्रा यांचे निधन मनीष मल्होत्रा यांच्यासाठी एक मोठा वैयक्तिक धक्का आहे. ते नेहमीच आपल्या आईला आपल्या कारकिर्दीचा पाया आणि प्रेरणा मानत असत. या दुःखद काळात इंडस्ट्रीतील मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी शक्तीचा स्रोत ठरला आहे.
सर्वात मोठी प्रेरणा
गरिमा मल्होत्रा या मनीष यांची सर्वात मोठी प्रेरणा होत्या. त्यांनी नेहमीच पडद्याआड राहून आपल्या मुलाच्या फॅशन साम्राज्याला पाठिंबा दिला. ‘रंगीला’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या मनीषच्या चित्रपटांमध्ये त्यांच्या डिझाइन्समधून ग्लॅमर झळकत होते. गरिमा यांचे साधे जीवन आणि कुटुंबाप्रती असलेली निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी होती. त्या अनेकदा मनीषसोबत फॅशन इव्हेंट्समध्ये दिसत असत, जिथे त्यांचे हास्य सर्वांना मोहित करत असे.
आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना मनीष यांना हा एक मोठा धक्का आहे. अलीकडेच ते आपल्या चित्रपट प्रकल्पांमध्ये आणि फॅशन शोमध्ये व्यस्त होते. बॉलिवूड समुदाय त्यांच्या समर्थनासाठी एकवटला आहे. अंत्यसंस्काराचा तपशील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. गरिमा यांचे निधन फॅशन जगतासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. देव त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.






