(फोटो सौजन्य - x अकाउंट)
एमटीव्हीचा लोकप्रिय शो ‘रोडीज डबल क्रॉस’ आता संपला आहे. १ जून रोजी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये एल्विश यादवच्या टोळीतील कुशल तंवर उर्फ गुल्लू याने रोडीज एक्सएक्सची ट्रॉफी जिंकली आहे. प्रिन्स नरुलाच्या टीमचा हरताज सिंग गिल पहिला रनर-अप होता. शोच्या फिनालेनंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याला स्क्रिप्टेड म्हटले. त्यांनी असे अनेक आरोप केले की शोमधील भांडणे आणि घडणारी सगळी गोष्ट स्क्रिप्टेड होती. त्यांच्या अलीकडील मुलाखतीत हरताज सिंग यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि सत्य सांगितले आहे.
Dipika Kakar: दीपिका कक्करवर यशस्वी शस्त्रक्रिया, पती शोएबने सांगितली अभिनेत्रीची हेल्थ अपडेट
शोवर केले अनेक आरोप
झूमला दिलेल्या एका खास मुलाखतीत हरताज सिंग गिल म्हणाले की ‘रोडीज डबल क्रॉस हा स्क्रिप्टेड शो नाही. तुम्ही स्वतःहून या शोमध्ये या. तुम्हाला येण्याची संधी दिली जाते. तुम्हाला ट्विस्टसह लोकांना वाचवण्याची संधी दिली जाते. हा स्क्रिप्टेड शो नाही. येथे कोणाला काय म्हणायचे आहे आणि कोण कोणाशी भांडत आहे हे सांगितले जात नाही. सर्व काही खरे घडते.’ असे त्याने म्हटले आहे.
कुशल तंवरसोबतच्या नात्याबद्दल मत मांडले
अर्थातच, रोडीजमधील वेगवेगळ्या गँग लीडर्समध्ये एक कठीण स्पर्धा आहे. दरम्यान, हरताज सिंगने शोचा विजेता कुशल तंवरसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘कुशल पडद्याबाहेर माझा खूप आदर करतो. तो प्रेमाने बोलतो. तो जेव्हा जेव्हा मुलाखतीत बोलतो तेव्हा तो माझे नाव घेऊन बोलतो. तो नेहमी म्हणतो की हरताज हा डबल क्रॉस किंग आहे.’ असे म्हणून त्याने त्यांच्या दोघांमधील खरं नातं सांगितले आहे.
बदनाम करण्याचा प्रयत्न
हरताज सिंग पुढे म्हणाले, ‘मला समजत नाही की तुम्ही एका व्यक्तीला मोठा भाऊ म्हणता, त्याला पाजी म्हणता आणि त्याच्याशी प्रेमाने बोलता पण कॅमेऱ्यावर काय होते. तुम्हाला हरताजची बदनामी करायची आहे. तरीही तुम्ही ते करू शकणार नाही. तो मला पडद्याबाहेर सांगतो की अरे पाजी हाच शो आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. जेव्हा एल्विश यादवने त्याला विचारले की सर्वात वाईट स्पर्धक कोण आहे? तेव्हा त्याने हरताजचे नाव घेतले. त्याच्या तोंडावर म्हणा. तू हा खेळ का खेळत आहेस?’ तो पुढे म्हणाला की रोडीजमध्येही हरताजसोबत असेच घडत आहे. शोच्या बाहेरही असेच घडत आहे. जर मला नंतर अधिक गोष्टी कळल्या तर मी त्याच्याशी त्याच्या पात्रतेनुसार वागेन.’ असे हरताज सिंग बोलताना दिसत आहे.