(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत सरकारने कन्नड चित्रपट ‘केडी: द डेविल’मधील ‘सरके चुनर तेरी’ या गाण्यावर अधिकृतपणे बंदी घातली आहे. बुधवारी संसदेतही या गाण्याच्या अश्लीलतेच्या वादाचा मुद्दा उपस्थित झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला माहिती दिली की, या गाण्यावर बंदी घालण्यात आली असून सेन्सॉर बोर्डाला नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या या गाण्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाद वाढत असताना निर्मात्यांनी हे गाणे यूट्यूबवरून आधीच हटवले होते. या प्रकरणावर चित्रपटसृष्टीसह धार्मिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. गायक अरमान मलिकपासून ते कंगना राणौतपर्यंत अनेकांनी या गाण्याच्या बोलांवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, हा मुद्दा संसदेतही गाजलेला आहे. ANI ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मंत्री अश्विनी वैष्णव या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. लोकसभेत सपा खासदार आनंद भदौरिया यांनी ‘सरके चुनरिया’ या गाण्यावर प्रश्न उपस्थित केला होता, ज्यामध्ये नोरा फतेही नृत्य करताना दिसते आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी ‘सरके चुनर तेरी’ गाण्यावर दिली प्रतिक्रिया
लोकसभेत या बॉलीवूड गाण्यावर बंदीच्या मुद्द्यावर बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “माननीय अध्यक्ष महोदय, ज्याबद्दल माननीय खासदारांनी उल्लेख केला त्या गाण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. आपल्या माध्यमातून संपूर्ण सभागृहाला सांगू इच्छितो की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताच्या संविधान निर्मात्यांनी घातलेल्या योग्य मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण स्वैरता नसून ते समाज आणि संस्कृतीच्या चौकटीतच असायला हवे.”
#WATCH | Speaking in Lok Sabha, on the ban on Bollywood film song ‘Sarke Chunariya’, Union Minister for Information & Broadcasting, Ashwini Vaishnaw says,” A ban has been imposed on the song. We must operate according to the reasonable restrictions under the Freedom of Speech.… pic.twitter.com/TMSBaiLVke — ANI (@ANI) March 18, 2026
गाणे प्रदर्शित होताच नोरा फतेही आणि संजय दत्त चर्चेत
खरं तर ‘सरके चुनर तेरी’ हे गाणं रिलीज होताच संपूर्ण वादाला सुरुवात झाली. या गाण्यात नोरा फतेही आणि संजय दत्त दिसले आहेत. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याच्या बोलांवर टीका होऊ लागली आणि डान्स स्टेप्सवरही जोरदार आक्षेप घेतले गेले. अनेकांनी हे गाणं अत्यंत अश्लील असल्याचं म्हटलं आहे. इतकं की ते ऐकणंही कठीण असल्याची प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. या चित्रपटात नोरा फतेही आणि संजय दत्त प्रमुख भूमिकेत असून, हे गाणं हिंदी तसेच मूळ कन्नड आवृत्तीत उपलब्ध होणार आहे.
‘The Kerala Story 2’ चा बॉक्स ऑफिसवर धमाका! दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांची भावनिक प्रतिक्रिय
या गाण्याची नवीन आवृत्ती तयार करण्याचा निर्णय
‘सरके चुनर तेरी’ गाण्यावरील वाद वाढत असल्याचे पाहून निर्मात्यांनी ते यूट्यूबवरून हटवले आहे. त्यानंतर त्यांनी हे गाणे नव्या आवृत्तीत पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेतला असून, कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी गाण्याचे बोल बदलण्यात येणार आहेत. मात्र, हे नवे गाणे नेमके कधी प्रदर्शित होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही, परंतु ते लवकरच प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.






