Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shefali Jariwala : 4 वर्षात बिग बाॅस 13 च्या दुसऱ्या स्पर्धकाचे निधन! अभिनेत्रीने EX बाॅयफ्रेंडसाठी केली शेवटची भावुक पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. तिने तिच्या अखेरचा श्वास ४२ व्या वर्षी सोडला. तिच्या या निधनाने सर्वानाच धक्का बसला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 28, 2025 | 08:31 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Follow Us:

 

Shefali jariwala died : बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन त्याच्या वयाच्या 40 व्या वर्षी झाले. त्याच्या या निधनाने सर्वांचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता बिग बॉस 13 ची वाइल्ड कार्ड प्रसिद्ध स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. तिने तिच्या अखेरचा श्वास ४२ व्या वर्षी सोडला. तिच्या या निधनाने सर्वानाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर सध्या तिची एक सोशल मिडीया पोस्ट व्हायरल होत आहे. 

शेफाली जरीवाला उर्फ काटा लगा या गाण्यामधुन तिला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बाॅस 13 मध्ये सामील झाली होती यामध्ये ती वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणुन सहभागी झाली होती. ती बिग बाॅसच्या घरामध्ये सामील झाल्यानंतर पहिल्याच आठवठ्यामध्ये तीला घराचे कर्णधारपद मिळाले होते, यानंतर सलमान खानने देखील तिचे आणि तिने खेळलेल्या खेळाचे कौतुक केले होते. तिचा दुसरा पती पराग त्यागी हा देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. 

Shefali Jariwala Love Story: घटस्फोटाचे दुःख, पराग त्यागीच्या चांगुलपणा आणि काळजीने सावरले; शेफालीने केला होता खुलासा

पती पराग त्यागीसोबत तिने डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिये’ मध्ये भाग घेतला. ४२ वर्षीय अभिनेत्री शेफाली जरीवालाची एक्सवरील शेवटची पोस्ट सिद्धार्थ शुक्लासोबत आहे. शेफालीने सप्टेंबर २०२४ मध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या पुण्यतिथीनिमित्त ही पोस्ट शेअर केली होती. बिग बॉस १३ चा सह-कलाकार सिद्धार्थ शुक्लाचेही सप्टेंबर २०२१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सिद्धार्थला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली होती.

Thinking of you today mere dost @sidharth_shukla ❤️ pic.twitter.com/sZNv6Ft1hG — Shefali Jariwala (@shefalijariwala) September 2, 2024

शेफाली जरीवालाने २००४ मध्ये आलेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या बॉलिवूड चित्रपटात सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम केले होते. शेफाली जरीवालाने एएलटी बालाजीच्या ‘बेबी कम ना’ या वेब सिरीजमध्ये श्रेयस तळपदेसोबत काम केले होते. शेफाली तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकसाठी इंस्टाग्रामवर सक्रिय होती. तिचा माजी पती हरमीत सिंग हा मीट ब्रदर्सचा संगीतकार आहे, ज्याच्यापासून तिने २००९ मध्ये घटस्फोट घेतला होता. ती तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत होती.

Web Title: Shefali jariwala is the second contestant to pass away in 4 years on bb13 actress posted an emotional ex boyfriend sidharth shukla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • Entertainement News
  • shefali jariwala
  • sidharth shukla

संबंधित बातम्या

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
1

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
2

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
3

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.