शेफाली आणि परागची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
काही माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे निधन झाल्याचा दावा केला जात आहे. ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफालीचे शुक्रवारी रात्री उशिरा वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले जात आहे.
तिचा पती पराग त्यागी आणि इतर तिघे जण शेफालीला मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या निमित्ताने लोक शेफालीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोलत आहेत. शेफालीच्या लव्ह स्टोरीबाबत तुम्हाला माहीत आहे का? (फोटो सौजन्य – Instagram)
शेफाली आणि परागची पहिली ओळख
शेफाली जरीवाला आणि पराग यांचे २०१४ मध्ये लग्न झाले. जरीवाला आणि परागची प्रेमकहाणी पूर्णपणे फिल्मी असल्याचे म्हटले जाते. ज्याप्रमाणे चित्रपटांमध्ये हिरो आणि हिरॉईन पहिल्यांदा एका पार्टीत भेटतात, त्याचप्रमाणे शेफाली जरीवाला आणि पराग पहिल्यांदा भेटले. शेफालीसाठी हा काळ खूप कठीण होता, कारण ती तिच्या घटस्फोटाच्या कठीण काळातून जात होती. अशा वेळी, नवीन नात्यासाठी पुढे जाणे खूप कठीण असते. मात्र परागने आपले मन कसे जिंकले याबाबत शेफालीने स्वतः एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.
परागचा साधेपणा आवडला
शेफालीला पुन्हा लग्न करायचे नव्हते. पण घटस्फोटानंतर पराग तिच्या आयुष्यात आला आणि या काळात परागचा साधेपणा आवडला आणि त्याच्या काळजी घेणाऱ्या स्वभावानेही शेफालीचे मन जिंकले. सगळ्यात आधी ते मित्र बनले आणि नंतर डेटिंग करू लागले. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. याशिवाय असेही म्हटले जाते की दोघेही कॉमन मित्रांद्वारे भेटले होते.
शेफाली जरीवालाचा घटस्फोट
शेफाली जरीवालाने २००४ मध्ये प्रसिद्ध गायक जोडी ‘मीट ब्रदर्स’च्या हरमीत सिंगशी लग्न केले, परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने २०१४ मध्ये परागशी लग्न केले. शेफालीने फारच कमी वयात फेम मिळवले होते आणि तिचे लग्नही कमी वयातच झाले होते. मात्र नंतर तिने परागशी व्यवस्थित विचार करून लग्न केल्याचे सांगितले होते.
‘शेफाली खूप गोड व्यक्ती आहे’
शेफालीचा पती परागने एका मुलाखतीत सांगितले की जेव्हा त्याने पहिल्यांदा शेफालीला पाहिले तेव्हा तो तिच्या साधेपणाने आणि तिच्या कुटुंबावरील प्रेमाने खूप प्रभावित झाला. तो म्हणाला, ‘शेफाली खूप गोड व्यक्ती आहे. जेव्हा तिचा म्युझिक व्हिडिओ आला तेव्हा लोकांनी तिची वेगळीच स्टाईल पाहिली आहे, पण खऱ्या आयुष्यात ती पूर्णपणे वेगळी आहे. ती तिच्या पालकांची खूप काळजी घेते, जसे एक मुलगा करतो. ती माझ्या पालकांचीही अशीच काळजी घेतो. मी स्वतः माझ्या पालकांसाठी इतका वेळ काढू शकत नाही, पण शेफाली नेहमीच त्यांच्याशी जोडलेली असते.’
परागवर शोककळा
पराग नेहमीच शेफालीबाबत आपले प्रेम खुलेआम व्यक्त करत असे. अगदी एअरपोर्टवरदेखील तिला सोडायला गेल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. या सगळ्यामुळे परागवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्याकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र त्याचा हॉस्पिटलमधून निघताना व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे