Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Governor 1st Look: OTTचा ‘फॅमिली मॅन’ आता पुन्हा मोठ्या पडद्यावर, ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

मनोज बाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास सरप्राईज देण्यात आले आहे. गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 23, 2026 | 01:29 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • OTTचा ‘फॅमिली मॅन आता पुन्हा मोठ्या पडद्यावर
  • ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चित्रपटाचे पहिलं पोस्टर रिलीज
  • मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवशी खास भेट
दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांनी यापूर्वी अनेक वेगळ्या धाटणीचे आणि प्रयोगशील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. आता ते आणखी एका रोचक आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रोजेक्टसह परत येण्यासाठी सज्ज झाले आहेत.ताज्या अपडेटनुसार, त्यांच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर्स समोर आले असून, त्यामध्ये कथानकाबाबत एक गूढ आणि रहस्यमय वातावरण दिसून येत आहे. ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ असे या चित्रपटाचे नाव असून, या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त हा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यांच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे या चित्रपटाबद्दल आधीपासूनच अपेक्षा वाढल्या आहेत. पोस्टर पाहून हा चित्रपट एक थरारक आणि सस्पेन्सने भरलेला अनुभव देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चित्रपटाचे पहिलं पोस्टर रिलीज

‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच रिव्हील करण्यात आला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.पोस्टरमध्ये मनोज बाजपेयी पाठमोरे दिसत आहेत, हातात सूटकेस घेऊन ते एका कॉरिडॉरमधून चालताना दाखवले गेले आहेत. त्यांच्या मागे असलेली टॅगलाईन लक्ष वेधून घेते. “जर मी अपयशी ठरलो… तर इंडिया अपयशी ठरेल.” ही ओळ एका हाय-स्टेक्स लीगल ड्रामाची झलक देणारी आहे.दुसऱ्या पोस्टरमध्ये हिरव्या रंगाची एक खुर्ची दाखवण्यात आली असून त्यावर “इंडिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे” आणि “ही फक्त खुर्ची नाही… जबाबदारी आहे” अशा प्रभावी टॅगलाईन्स आहेत. या दृश्यांमधून देशाशी संबंधित गंभीर आणि थरारक कथानकाची स्पष्ट झलक मिळते.

हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह आणि मनोज बाजपेयी यांचा पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते एकत्र येत असल्याने या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. ‘सनशाईन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट एक इंटेन्स आणि विचार करायला लावणारा ड्रामा ठरणार आहे.

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवशी खास भेट

मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर रिलीज करण्यात आल्याने हा क्षण आणखी खास बनला असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या चित्रपटासोबत विपुल अमृतलाल शाह पुन्हा एकदा एक दमदार कथा घेऊन येत आहेत. तसेच, मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवशी पोस्टर रिलीज करण्याची ही पद्धत साऊथ इंडस्ट्रीतील त्या ट्रेंडची आठवण करून देते, जिथे कलाकारांच्या वाढदिवशी त्यांच्या चित्रपटांच्या खास झलक शेअर केल्या जातात आणि हा दिवस चाहत्यांसाठी अधिक खास बनवला जातो.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरला दिग्गजांकडून दाद; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह यांनी प्रोड्यूस केला असून ‘सनशाईन पिक्चर्स’तर्फे सादर करण्यात येत आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते आशिन ए. शाह आहेत. चित्रपटाची कथा सुवेंदू भट्टाचार्जी, सौरभ भरत, रवि असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी मिळून लिहिली आहे. जावेद अख्तर यांच्या गीतांसह चित्रपटाचे संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे.लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता अधिकच वाढताना दिसत आहे.

Web Title: Special birthday surprise for manoj bajpayee first look poster of governor the silent savior released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Actor
  • Bollywood
  • bollywood movies

संबंधित बातम्या

Slumdog Teaser: विजय सेतुपतीचा रहस्यमय आणि धडकी भरवणारा अंदाज, तब्बूची पोलिस भूमिका ठरतेय आकर्षण
1

Slumdog Teaser: विजय सेतुपतीचा रहस्यमय आणि धडकी भरवणारा अंदाज, तब्बूची पोलिस भूमिका ठरतेय आकर्षण

Batwara First look: भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा पुन्हा उघडणार? सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
2

Batwara First look: भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा पुन्हा उघडणार? सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

‘ब्राऊन’च्या शूटिंगदरम्यान काय घडलं? करिश्मा कपूरच्या एका कृतीने दिग्दर्शक अभिनय देव यांचा दृष्टिकोनच बदलला
3

‘ब्राऊन’च्या शूटिंगदरम्यान काय घडलं? करिश्मा कपूरच्या एका कृतीने दिग्दर्शक अभिनय देव यांचा दृष्टिकोनच बदलला

Eetha Release Date: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची प्रतीक्षा संपली; रिलीज डेट आली समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपटगृहांत प्रदर्शित
4

Eetha Release Date: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची प्रतीक्षा संपली; रिलीज डेट आली समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपटगृहांत प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.